⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे बँक खाते क्रमांक तपशिल पडताळणी | Shalarth Portal Update

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे बँक खाते क्रमांक तपशिल पडताळणी Verification of bank account number details of teaching and non-teaching staff in Shalarth Portal

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे बँक खाते क्रमांक तपशिल पडताळणी

Verification of bank account number details of teaching and non-teaching staff in Shalarth Portal

राज्यातील खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे दरमहा १ तारखेला वेतन होण्यासाठी SBI CMP प्रणाली शालार्थ प्रणालीबरोबर Integrate केली असून शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अचूकपणे त्यांचे बँक खात्यावर जमा होणेसाठी सर्व संबंधित कार्यरत कर्मचा-यांचे वैयक्तिक बँक खाते क्रमांक शालार्थ प्रणालीमध्ये पडताळणी (Verify) करणे आवश्यक आहे. त्यासाठीची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये विकसित केली असून शाळेच्या (डिडिओ १) च्या लॉगईन वरून सर्व कर्मचा-यांचे बँक खाते क्रमांक पडताळणी (Verify) करणेबाबत संबंधित सर्व मुख्याध्यापक यांना सुचना देण्यात याव्यात. शाळेच्या लॉगईन वरून रिपोर्टमधून बँक स्टेटमेंटची प्रिंट काढून त्यावरील बँक खाते क्रमांक अचूक असल्याचे खात्री करण्यासाठी सदर बँक खाती क्रमांक सर्व कर्मचा-यांचे निदर्शनास आणून सदर बँक खाते क्रमांक अचूक असल्याचे त्यावर कर्मचा-याची स्वाक्षरी घेऊन दप्तरी जतन करून ठेवावे व शालार्थ प्रणालीमध्ये खालील पाथवर कर्मचा-यांचे बँक खाते क्रमांक Verify करावे.

Path: Current Path: Worklist > Payroll > CMP_BANK_DETAILS > Verify Bank Details For CMP Employee.

तसेच कर्मचा-यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे Verify केल्यास त्यामध्ये दुरुस्ती किंवा अद्ययावत करण्याबाबतचा पाथ खालीलप्रमाणे आहे.

Path: Current Path : Worklist > Payroll > CMP _BANK_DETAILS > Update Bank Details For CMP

  • ·        एकदा कर्मचा-यांचे बँक खाती क्रमांक Verify झाल्यांनतर ते शालार्थमध्ये फ्रिज होतील त्यामध्ये बदल करावयाचा झाल्यास डिडिओ-२/डिडिओ-३ कडे विनंती पाठवावे लागेल.
  • ·        त्यामुळे सर्व कर्मचा-यांचे बँक खाती क्रमांक अचूकपणे व मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली Verify करावे.
  • ·        सदर कार्यवाही ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करावी.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम