जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा
जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय
दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचा-यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी
संबंधित विभागीय आयुक्त, यांच्याकडे तक्रारी कराव्यात व अशी तक्रार
प्राप्त झाल्यास संबंधित विभागीय आयुक्तांनी प्रकरणपरत्वे तक्रारीची शहानिशा करून
३० दिवसांत निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट तरतूद उक्त दिनांक
०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद १९ मध्ये नमूद आहे.
त्यानुषंगाने कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना
देण्यात येत आहे :
१) सन २०२२ मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भात
कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास सदर तक्रारीबाबत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक
बाबींशी संबंधित वस्तुस्थिती सदर कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेकडून
मागवून घ्यावी.
२) सदर बदली प्रक्रीया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय
जेष्ठतेनुसार विनंतीप्रमाणे करण्यात आली असून सदर प्रणाली Vinsys IT
Services (I) Pvt. Ltd यांच्यार्फत विकसित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने Vinsys IT Services (I) Pvt. Ltd यांच्याकडे ottgrievancecell@vinsys.com या ई-मेलवर
खालील स्वरुपात माहिती सादर करुन अभिप्राय प्राप्त करुन घ्यावेत -
i. शिक्षकांचे नाव
ii. मोबाईल क्रमांक -
iii.शालार्थ क्रमांक -
iv.कार्यरत जिल्हा परिषद -
V.नियुक्तीचा प्रवर्ग -
vi. ज्या प्रवर्गातून बदलीसाठी अर्ज केला होता तो प्रवर्ग (जात प्रवर्ग)
vii. ज्या संवर्गातून बदलीसाठी अर्ज केला होता तो संवर्ग
( ना-हरकत प्रमाणपत्रधारक / विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ / विशेष संवर्ग शिक्षक
भाग-२ / सवर्साधारण संवर्ग) –
viii.निवडलेल्या जिल्ह्याचे पर्याय -
१)
2)
३)
४)
ix. तक्रारीचा थोडक्यात तपशील -
३) सदर तक्रारीबाबत संबंधित जिल्हा परिषदेकडून प्राप्त
वस्तुस्थिती, तसेच Vinsys IT Services (I) Pvt. Ltd यांच्याकडील अभिप्राय विचारात घेऊन प्रकरणपरत्वे तक्रारीची शहानिशा करुन
संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार विभागीय आयुक्त
यांनी निर्णय घ्यावा.
४) आंतरजिल्हा बदलीसंदर्भात कर्मचा-याची काही तक्रार
असल्यास अशी तक्रार सदर कर्मचारी सद्य:स्थितीत कार्यरत असलेली जिल्हा परिषद ज्या
विभागीय आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात आहे, त्याच विभागीय
आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित मुख्य कार्यकारी
अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत सर्व संबंधित
शिक्षकांना कळविण्यात यावे.
तसेच, असा तक्रार अर्ज अन्य विभागीय आयुक्त
यांच्याकडे प्राप्त झाल्यास, सदर तक्रार अर्ज संबंधित
कर्मचारी सद्य:स्थितीत (बदली होण्यापूर्वी) कार्यरत असलेली जिल्हा परिषद ज्या
विभागीय आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या विभागीय
आयुक्तांकडे पुढील आवश्यक त्या निर्णयासाठी हस्तांतरित करावा व तसे संबंधित
कर्मचाऱ्यास कळवावे.
२. शासनाच्या संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसंदर्भात प्राप्त तक्रारीची प्रकरणपरत्वे शहानिशा करुन विहीत कालावधीत निर्णय घ्यावा.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS