⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

गृहपाठ बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार | State Govt Considering Stopping Homework

गृहपाठ बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार | State Govt Considering Stopping Homework

 गृहपाठ बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार | State Govt Considering Stopping Homework

इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.तज्ज्ञांशी चर्चा करून गृहपाठ बंदीचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुलांवर अभ्यासाचे ओझे नको, असे माझे वैयक्तिक मत आहे. मुलांच्या मनाचा विकास झाला पाहिजे. तसेच, गृहपाठ हा शिक्षकांसाठी दोष नसावा. विद्यार्थ्यांना लवकर समजेल अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. पण हा एक मोठा निर्णय आहे आणि ते माझे वैयक्तिक मत आहे. याबाबत शिक्षक संघटना, संस्था व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

डॉक्टरसाठी Dr, वकिलांसाठी Adv वापरले जाते तसेच शिक्षकांसाठी Tr संबोधता येईल का यावर विचार सुरु.शिक्षक गुरुवर्य असतात, पूजनीय असतात. शिक्षक समाजातील महत्वाचा घटक, समाजाने त्यांनासुद्धा मान दिला पाहिजे.मी जेव्हा शिक्षकांकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा शिक्षणमंत्री म्हणून त्यांना मान देण्याची जबाबदारी माझी सुद्धा आहे.- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राज्य सरकारने घेतल्यास पुन्हा घरी येऊन अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना खेळासाठी अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मुलांवरील ओझे कमी होणार आहे.

पुस्तकातच नोटबुकचे पानही जोडण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे, मात्र त्यामुळे प्रत्यक्षात नोटबुकचे वजन कमी होणार की नाही, यात संभ्रम निर्माण झाला आहे.

Poll Maker

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम