⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी
Enrollment of name in voter list for elections in graduate and teacher constituencies

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकपूर्तीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन परिपत्रक - दिनांक 12 सप्टेंबर 2022

भारत निवडणूक आयोगाच्या दि.१४.०७.२०२२ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघामध्ये सन २०२३ मध्ये होणाऱ्या द्विवार्षिक निवडणूकींसाठी त्या विभागातील अनुक्रमे पदवीधर व शिक्षक यांची दि. १-११-२०२२ या अर्हता दिनांकावर पुर्णत: नविन मतदार यादी (de-novo elector's roll) तयार करण्याची मोहीम दि.०१.१०.२०२२ पासून सूरु होत आहे.

या मोहिमेंतर्गत दि. १-१०-२०२२ ते दि. ७-११-२०२२ या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना १८ (Form १८) व शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना १९ (Form १९) स्विकारण्यात येतील. 

माहिती दिनांक
मतदार नोंदणी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर2022
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणे दिनांक 23 नोव्हेंबर 2022
दावे व हरकती स्वीकारणे दिनांक 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022
अंतिम यादी प्रसिद्ध करणे दिनांक 30 डिसेंबर ते डिसेंबर 2022

यासंबंधीचे शासन परिपत्रक - दिनांक 12 सप्टेंबर 2022

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम