⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित | Procedure for appointment of teachers on hourly basis fixed

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित Procedure for appointment of teachers on hourly basis fixed

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित
Procedure for appointment of teachers on hourly basis fixed

नेट-सेट / पी.एचडी. धारक संघर्ष समितीच्या विविध मागण्यांबाबत मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ जून, २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे बैठक झाली होती. सदर बैठकीत "तासिका तत्वाच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी." असे निर्देश मा. मंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुसार तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेऊन नवीन पर्यायी धोरणाबाबत शासनास शिफारस करण्यासाठी शासन निर्णय दि. १० ऑगस्ट, २०२१ अन्वये संचालक, उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२ च्या पत्रान्वये सादर केला आहे.

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित | Procedure for appointment of teachers on hourly basis fixed

तासिका तत्वाच्या घोरणासंदर्भात उपरोक्त समितीने विविध ९ शिफारशी केल्या आहेत. त्यापैकी तासिका तत्वावरील अध्यापकांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणे (शिफारस क्रमांक ४) व तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीसाठी कार्यपध्दती विहित करणे (शिफारस क्रमांक ६) येथील शिफारशी स्विकारण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करणे (शिफारस क्रमांक १), तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन नियमित अध्यापकांप्रमाणे थेट बँक खात्यावर जमा करणे (शिफारस क्रमांक २) शिल्लक कार्यभारावर तासिका तत्वावरील अध्यापकाची नियुक्ती करणे (शिफारस क्रमांक ३) येथील शिफारशी विभागाने प्रस्तावित केलेल्या बदलांसह स्विकारण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच, तासिका तत्वावरील अध्यापकांना केलेल्या सेवेचे अनुभव प्रमाणपत्र देणे (शिफारस क्रमांक ५). तासिका तत्वावरील अध्यापकांना परीक्षाविषयक पर्यवेक्षण व मूल्यांकनांचे काम देणे (शिफारस क्रमांक ७). तासिका तत्त्वावरील अध्यापकांची त्याच महाविद्यालयांमध्ये पुनर्नियुक्ती करावयाची असल्यास नव्याने कार्यपध्दती राबविण्यात येऊ नये (शिफारस क्रमांक ८) व प्रचलित आरक्षण धोरणानुसार तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती करणे (शिफारस क्रमांक ९) या शिफारशी नाकारण्यात आल्या आहेत.

१. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून तासिका तत्वावरील अध्यापकांच्या सेवा उपलब्ध होऊन शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे पारपाडता यावे याकरिता तासिका तत्वावरील अध्यापकांची प्रत्येक वर्षी नियुक्ती करण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे.

२. संबंधित महाविद्यालयाने तासिका तत्वावरील अध्यापकाची विहित कार्यपध्दतीनुसार नियुक्ती झाल्याची खात्री करावी. त्यानंतर तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन वेळेवर अदा करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह. परिपूर्ण प्रस्ताव सहसंचालक, उच्च शिक्षण यांना सादर करावा. सहसंचालक, उच्च शिक्षण यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत असल्याची खात्री करावी आणि तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन संबंधित महाविद्यालयामार्फत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी. तसेच, तासिका तत्वावरील मानधन अदा करण्याबाबतचा दस्ताऐवज कार्यालयात जतन करून ठेवावा.

३. एका पूर्णवेळ रिक्त पदाकरिता फक्त दोनच तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नेमणूका करण्यास तसेच एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त ९ तासिकांचा कार्यभार सोपविण्यास दिनांक १४ नोव्हेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. वरीलप्रमाणे अध्यापकांकडे कार्यभार सोपविल्यानंतर देखील कार्यभार शिल्लक राहात असल्यास उर्वरित कार्यभारासाठी तासिका तत्वावरील अध्यापकाची नियुक्ती करता येईल. तथापि, उर्वरित कार्यभार हा किमान नऊ तासिकांचा असेल याची दक्षता घ्यावी.

४. अकृषि विद्यापीठे व संलग्नित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियुक्त करावयाच्या अध्यापकांकरिता विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाने वेळोवेळी शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता विहित केल्या आहेत. तासिका तत्वावरील अध्यापक म्हणून नियुक्तीकरिता उमेदवाराने उपरोक्त अर्हता धारण करणे बंधनकारक राहील.

5. तासिका तत्वावरील नियुक्ती शैक्षणिक वर्षासाठी मर्यादित असून सदर नियुक्ती पूर्णवेळ नियुक्ती नाही. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती. विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम २००१ मध्ये सदर अधिनियम तासिका तत्वावरील नियुक्त्यांनालागू असण्याबाबत कोणतीही तरतूद अंतर्भूत नाही,त्यामुळे तासिका तत्वावरील अध्यापकाच्या नियुक्त्यांना आरक्षण लागू होणार नाही.

संकलन- शासन निर्णय-17/10/2022

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम