⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विशेष सहाय्य योजना | Special Assistance Scheme

Sanjay Gandhi Destitute Grant Scheme. Shravanbal Seva State Pension Scheme. Indira Gandhi National Old Age Pension Scheme. Indira Gandhi National Widow Pension Scheme. Indira Gandhi National Disability Pension Scheme.

विशेष सहाय्य योजना | Special Assistance Scheme

राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र्य रेषेखालील वृध्द व्यक्तींकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा महिलांकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिव्यांग व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मा.लोकप्रतिनिधी, विविध संघटना, स्वयंसेवा संस्था व अनेक नागरिक यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा रुपये ६००/- वरुन रुपये १०००/- व सदरहू योजनेतील विधवा लाभार्थ्यांना १ अपत्य असल्यास दरमहा रुपये ११०० व २ अपत्य असल्यास रुपये १२०० इतके अर्थसहाय्य देण्याबाबत, मा. मंत्री (वित्त) महोदयांनी सन २०१९-२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने दिनांक ०७ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या मा.मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याबाबत गठीत संजय गांधी निराधार अनुदान समिती, समितीची कार्यकक्षा, योजनेचे निकष, लाभार्थ्यांचा पात्रतेच्या अटी व शर्ती त्याचप्रमाणे अनुदान वाटपाचे करावयाच्या कार्यवाही बाबतचे संदर्भ क्रमांक १ ते १४ येथील शासन निर्णय व परिपत्रके या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. तसेच विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याकरीता करावयाच्या कार्यपध्दती/ कार्यवाही या शासन निर्णयान्वये पुढीलप्रमाणे माहिती 

राज्य पुरस्कृत योजना :

संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नाव नसलेल्या व रु २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस मिळणाऱ्या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/अशी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/-, १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये ११००/- व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणा-या दरमहा रुपये ६००/अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १२००/- अशी करण्यात येत आहे.

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून रुपये ३००/- निवृत्तीवेतन देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/-(केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या निकषांच्या अधीन राहून लाभ देण्यात यावा.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना:

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नाव नसलेल्या व रु २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- अशी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/-, १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये ११००/- व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १२००/- अशी करण्यात येत आहे.

६५ वर्ष व ६५ वर्षावरील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा रुपये २००/- आणि ८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा अनुक्रमे रुपये ४०० व रुपये १००/अर्थसहाय्यात प्रत्येकी दरमहा रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- (६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी केंद्र शासनाचे रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) तर (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच दारिद्रय रेषेखालील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष या वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ६००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/(केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटाकरीता रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये १०००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

केंद्र पुरस्कृत योजना :

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना:

या योजनेमध्ये ग्रामीण भागाकरिता ग्राम विकास भागाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या सर्वेक्षणानुसार व शहरी भागासाठी नगर विकास विभागाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या घेतलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ६५ वर्ष व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. सदर योजनेतील ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दरमहा रु.२००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता लाभार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून देण्यात येणा-या अनुक्रमे रु.४००/- व रुपये १००/अर्थसहाय्यात प्रत्येकी रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- (६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी केंद्र शासनाचे रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-) अशी करण्यात येत आहे.

तसेच दारिद्रय रेषेखालील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- ( केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ६००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- ( केंद्र शासनाचे ६५ ते ७९ वर्ष वयोगटाकरीता रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये १०००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे.

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधिन राहून लाभ देण्यात यावा.

त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांचे वय ८० वर्ष झाल्यास त्या लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात यावा.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना:

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ४० ते ७९ वर्ष वयोगटातील विधवा महिला, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतंर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्र शासनाकडून लाभार्थ्याला रुपये ३००/- दरमहा देण्यात येतात. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) करण्यात येत आहे.

तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७०० /-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात येत आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना:

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी, फक्त १८ ते ७९ वर्ष वयोगटातील व ८० टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहुअपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमध्ये निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्रशासनाकडून लाभार्थ्यांना दरमहा रुपये ३००/अर्थसहाय्य देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) करण्यात येत आहे.

तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-), १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य ( २ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- ( केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनांसाठी योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत, समितीचे गठन, कार्यपध्दती, समितीच्या बैठका परिशिष्ट-१, नमुना-दोन प्रमाणे राहील.

२. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ज्या व्यक्तीचे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न, स्थावर / जंगम मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न वा सज्ञान मुलाकडून व इतर व्यक्तीकडून मिळत असलेली मदत असे सर्व एकत्रित करुन त्यांचे कायमस्वरुपी चरितार्थ चालविण्याकरीता पुरेसे उत्पन्न नसल्यास अशा व्यक्तीस / कुटुंबासनिराधार समजण्यात यावे.

३. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास लाभार्थ्यांची स्वतंत्रपणे गणना करण्यात येऊन अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

४. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मुले २५ वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (शासकीय/निमशासकीय/खाजगी) यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय/निमशासकीय /खाजगी) मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्यांची पात्रता ठरविण्यात यावी.

मात्र ज्या लाभार्थ्यांना फक्त मुलीच असतील अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत मुलीचे वय २५ वर्ष झाले अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न होऊन त्या सासरी गेल्या तरीसुध्दा लाभ चालू राहील.

५. विशेष सहाय्य योजनेसाठी लाभार्थ्यांकडून जातीचे प्रमाणपत्राची सक्ती न करता विहित प्रपत्रातील स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे. सदरचे स्वयंघोषणापत्र इतर शासकीय / खाजगी कामासाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. स्वयंघोषणापत्राचा विहित प्रपत्र सोबतच्या परिशिष्ट- १ नमुना नऊ मध्ये दर्शविला आहे.

६. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांकरीता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु. ५०,०००/- असून दिव्यांग लाभार्थी वगळून इतर सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु.२१,०००/- अशी राहील.

७. विशेष सहाय्य योजनेमधील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण दर महिन्याच्या १ तारखेलाच नियमितपणे करण्यात यावे.

८. विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र नवीन लाभार्थ्यांकरिता आधार कार्ड सक्तीचे राहील. तसेच विशेष सहाय्य योजनेमधील सध्याच्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी ३ महिन्याच्या आत संलग्न करण्याचे बंधनकारक राहील. नवीन पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड योजनेशी संलग्न केल्यानंतरच तसेच सध्याच्या लाभार्थ्याचे ३ महिन्यांनतर आधार कार्ड योजनेशी संलग्न केल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

९. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक ०१ सप्टेंबर, २०१९ पासून करण्यात येते आहे.

अर्ज मंजूर करण्याची पध्दत

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना.

(१) अर्ज करण्याची पध्दत :

(अ) अर्जदार या शासन निर्णयानुसार आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी निर्धारित केलेल्या, परिशिष्ट-१ मधील नमुना तीन मधील अर्जाच्या दोन प्रतीमध्ये, तो रहात असलेल्या भागातील संबंधित तलाठयाकडे अर्ज करील.

(ब) अशा अर्जासोबत लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटींच्या पुष्ठ्यर्थ संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून अशा प्रमाणपत्रांच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळावाव्यात.

(क) तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करुन अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे, याची सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी व अर्जदाराला विहित नमुन्यात पोच पावती द्यावी. तलाठी यांनी नोंदवही ठेवणे व त्यामध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक राहील.

(ड) तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्राची छाननी व पडताळणी करुन अर्ज संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांचेकडे पाठवावेत.

(२) तहसिलदार / नायब तहसिलदार यांच्याकडे आलेल्या अर्जाची छाननी :

(अ) संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांच्याकडे आलेले अर्ज, प्राप्त तारखेनुसार लावण्यात येतील व त्यांना नोंदणी क्रमांक देऊन एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेण्यात येईल.

(ब) आलेल्या अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पडताळणी संबंधित तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी करावी व समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार यांनी अर्जदारांची यादी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसमोर प्रत्येक महिन्यास निर्णयासाठी ठेवावी.

(क) प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समितीने करावी व छाननीनंतर लाभार्थ्यांची निवड समितीने करावी. अशी निवड झाल्यानंतर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सूचना फलकावर लावण्यात यावी.

(ड) अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कळवावे आणि ज्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत त्यांनाही कारणासह कळवावे.

(इ) अर्जांच्या छाननीमध्ये सदस्य सचिवांनी नामंजूर करण्याचे प्रस्तावित केलेले, पण समितीने पात्र ठरविलेल्या अर्जांबाबत उप विभागीय अधिकारी (महसूल) पुनर्विलोकन करुन निर्णय घेतील.

(ई) लाभार्थ्यांची यादी ग्रामसभा / प्रभाग सभेला माहितीसाठी पाठवावी. सदर पात्र तसेच अपात्र अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीच्या व प्रभाग कार्यालयाच्या सुचना फलकावर लावावी. सदर यादीचे वाचन ग्राम सभेत व प्रभाग कार्यालयात करावे. ग्रामसभेने / प्रभाग कार्यालयाने काही व्यक्तींची चुकीची निवड झाली आहे, असे पुराव्यासह कळविल्यास अशा अर्जाची पडताळणी करुन समितीसमोर फेरविचारार्थ ठेवावेत.

(फ) केंद्र शासनाच्या निकषानुसार वर्षातून दोनदा ग्रामसभेच्या स्तरावर अपात्र लाभार्थी शोध मोहिम घ्यावी.

(३) आर्थिक सहाय्य मंजूर करणे व तिचे वितरण:

या शासन निर्णयानुसार द्यावयाचे आर्थिक सहाय्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमार्फत मंजूर केले जाईल. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांची माहिती दर महिन्यास शासनाला कळविण्यात यावी. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम