⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना. State Level School and Other Sports Competitions 2022-23

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना.
State Level School and Other Sports Competitions 2022-23

विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांची बैठक दि.२२.०९.२०२२.

  • सन २०२२ - २३ मधील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये एकुण ११ खेळप्रकारांचे आयोजन करावे. सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल व जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेचे आयोजन पुर्ण झाले आहे.
  • तालुकास्तरावर १० खेळप्रकार तसेच जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर एकुण ९१ खेळप्रकारांचे आयोजन करणे प्रस्तावित आहे.
  • प्रचलित नियमानुसार, तालुकास्तरावर कुस्ती, कबड्डी, खो खो, व्हॉलीवॉल व अॅथलेटिक्स हे अनिवार्य ५ खेळप्रकार तसेच उर्वरीत ५ खेळप्रकारांची निश्चीती जिल्हा क्रीडा परिषदेच्या मान्यतेने करावी.
  • विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन करताना तालुका व महानगरपालिकास्तर दि.१ ते २० ऑक्टोबर, जिल्हा व विभागस्तर दि. २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन दि.२० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करावे.
  • दि. २४ डिसेंबर २०१४ च्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार ४९ खेळप्रकारांच्या आयोजनास निधी वितरीत केला जाणार असून उर्वरीत ४२ खेळप्रकारांचे आयोजन शासन निर्देशानुसार संबंधित संघटनांच्या तांत्रीक व आर्थीक सहकार्याने करणे बंधनकारक आहे.
  • सद्यस्थितीत शासनाने राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धा आयोजनास मान्यता प्रदान केली असून राष्ट्रीय शालेय स्पर्धाबाबतची निश्चीती झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल याबाबत सहभागी खेळाडू, शाळांना अवगत करावे.
  • विविध स्तरावरील शालेय स्पर्धांचे आयोजन हे संबंधित एकविध खेळ संघटनांच्या तांत्रीक सहकार्याने व शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सहिंतामधील तरतुदीनुसार पार पाडावे.
  • शालेय क्रीडा स्पर्धेसाठीचा निधी हा प्रशासकीय कारणास्तव माहे डिसेंबर २०२२ मध्ये प्राप्त होणार आहे. तोपर्यंत जिल्हा क्रीडा परिषद निधी व प्रवेश फी यामधुन स्पर्धेचा खर्च भागवावा लागणार आहे.
  • नव्याने समावेश केलेल्या ४२ खेळप्रकारांचे आयोजन हे जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर करणे प्रस्तावित असून सहभागी खेळाडूंना शासन निर्देशानुसार कोणत्याच शासकीय सुविधांचा लाभ मिळणार नाही याबाबत त्यांना अवगत करावे.
  • नव्याने समावेशीत ४२ खेळप्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धांची स्थळनिश्चीती ही आयोजनाची मागणी क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल.
  • कोवीड-१९ रोगाच्या प्रादूर्भावामुळे गत २ वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले नसल्याने या वर्षात शालेय स्पर्धा आयोजनांस व्यापक प्रसिध्दी देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत.
  • सर्वच स्तरावरील स्पर्धेचे आयोजन हे विनातक्रार पुर्ण होण्यासाठी, उत्कृष्ट मैदान व्यवस्था, स्वच्छता, तज्ञ पंचांची नियुक्ती व सुयोग्य नियोजन होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत.

राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनबाबत प्राप्त झालेल्या मागणीनुसार खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे राज्य स्पर्धा आयोजन स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत.

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना. State Level School and Other Sports Competitions 2022-23

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना. State Level School and Other Sports Competitions 2022-23

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना. State Level School and Other Sports Competitions 2022-23

राज्यस्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मधील आयोजन, सर्वसाधारण सुचना. State Level School and Other Sports Competitions 2022-23

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळ

शालेय व इतर क्रीडा परिपत्रक.pdf

●●●●●● 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम