तिसरी पासून परिक्षा सुरू होणार, शालेय शिक्षणमंत्री
तिसरी पासून परिक्षा सुरू होणार, शालेय शिक्षणमंत्री
राज्यात आठवी पर्यंत परिक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता पुन्हा तिसरी पासून परिक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतेवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याबाबत राज्यातील शिक्षण तज्ज्ञांची चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रामत बोलताना त्यांनी तिसरी पासून परिक्षा सुरू करण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली.
केसरकर म्हणाले की, आठवी पर्यंत परिक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवी पर्यंत त्यांना अनुत्तिर्न करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर इयत्ता तीसरी पासून पुन्हा परिक्षा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुतिर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल. तसेच सर्वांना विश्वासात घेऊन शिक्षण विभागातील निर्णय घेण्यात येतील असेही ते म्हणाले.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS