Babasaheb Ambedkar Swadhar Yojana started,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
Bharat Ratna Dr. Application distribution of Babasaheb
Ambedkar Swadhar Yojana
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी
तसेच दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गात
प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेचे अर्ज वाटप सुरु असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे
यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ
मिळण्याकरिता सातारा नगरपालिका हद्दिपासून 5 किमी अंतराच्या आतील महाविद्यालयामध्ये
अनुसूचित जाती व नबबौध्द प्रवर्गाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज
करण्याचे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.
संपर्कासाठी पत्ता -
सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003. फोन नं. 02162-298106
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा
विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा
पदविका परीक्षेत ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के आवश्यक आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी त्याच्या राहत्या जिल्याच्या बाहेर शिक्षण घेत असावा.
- विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी शिक्षण घेत नसावा.
- लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
- एखादा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थ्यांना स्वतःचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे.
- जर एखादा विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे तसे जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये खोटी,बनावट माहिती तसेच दिशाभूल
करणारे पुरावे /कागदपत्रे देऊन लाभ घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न
केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन
गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व
विद्यार्थ्याला सदर योजनेकरीता अपात्र ठरवण्यात येईल व विद्यार्थ्याला सदर
योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम (१२टक्के) व्याजासह वसूल करण्यात येईल.
- स्वाधार योजनेचे विशेष अनुदान योजने
संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्व
अधिकार असतील अर्ज करणारा विद्यार्थी हा शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून
प्रवेशित असावा.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जाचा नमुना
- विद्यार्थ्याचे दहावी पास प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्माचा दाखला
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा / विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला.
- सन 2023-24 या
आर्थिक वर्षात तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या
पालकांचा / आई-वडील यांचा उत्पन्नाचा दाखला.
- विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला. विद्यार्थीचे ज्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आहे त्या खात्याची झेरॉक्स प्रत.
- पालकाचे / आई-वडीलांचे सदर अर्जात नमूद केलेले घोषणापत्र.
- मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र किंवा शिफारस पत्र.
- विद्यार्थी BPL कुटुंब धारक असल्यास
प्राधान्य देण्यात येईल.
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर संबंधित महाविद्यालयाकडून बोनाफाईड दाखला सादर करावा.
- ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तिथून महाविद्यालय उपस्थिती प्रमाणपत्र.
- विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS