⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

४८६० केंद्र प्रमुखांची पदोन्नतीने व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे होणार भरती

kendrapramukh bharti 2022 kendrapramukh bharti 2022 maharashtra Kendrapramukh Bhartiकेंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे Kendrapramukh through direct service and limited departmental exam

केंद्रप्रमुखाची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे 

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय उक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०१० अन्वये केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा, पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४० : ३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि.१०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले. संदर्भ क्र.८ येथील शासन निर्णयान्वये सदर पदे भरणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. परंतु सदर कार्यपध्दतीनुसार पदे भरली जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे १०० टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.  
केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत. 
 
०२. केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. 
 
०३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत. 
 
०४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी: 
 
४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल. 
 
४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुप:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:
१. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. 
 
२. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील. 
 
३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल. 
 
४. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल. 
 
४.३ परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.
पेपर क्र. घटक उपघटक प्रश्नसंख्या गुण
पेपर क्र. घटकबुध्दिमत्ता व अभियोग्यता उपघटक**अभियोग्यता- तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. **बुध्दिमत्ता-आकलन, वर्गीकरण, समसंबंध,क्रमश्रेणी, तर्क व अनुमान,कूटप्रश्न, सांकेतिक भाषा,लयबध्द मांडणी इ. प्रश्नसंख्या१०० गुण१००
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकभारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय प्रश्नसंख्या१० गुण१०
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकशिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य प्रश्नसंख्या१० गुण१०
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकमाहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक) प्रश्नसंख्या१५ गुण१५
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकअभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती प्रश्नसंख्या१५ गुण१५
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकमाहितीचे विश्लेषण व मूल्यमापन प्रश्नसंख्या२० गुण२०
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकविषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेषकरुन इंग्रजी विषयज्ञान प्रश्नसंख्या१५ गुण१५
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकसंप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) प्रश्नसंख्या१५ गुण१५
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकएकूण प्रश्नसंख्या१०० गुण१००
पेपर क्र. घटकशालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह उपघटकएकूण प्रश्नसंख्या२०० गुण२००

अनुक्रमांक २ मधील उपघटकांचे स्वरुप :

उपघटक १ : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, २०११ (अद्ययावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी

क) बाल हक्क संरक्षण कायदा, २००५ - बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

उपघटक २ : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT,M, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

 

उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक ५  : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.

ड) संप्रेषण कौशल्य : समाज संपर्काची विविध साधने

उपघटक ६ : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान

ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.

केंद्र प्रमुख पदाच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

  • मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.
  • विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहतील.

************

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे
Kendrapramukh through direct service and limited departmental exam

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे-; रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास सादर करणेबाबत वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. मा. मंत्री (शालेय शिक्षण), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५० : ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदरील कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करून द्यावी जेणेकरुन केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करुन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे संचालनालयास सुलभ होईल असे परिपत्रकात दर्शवलेले आहे.

केंद्रप्रमुख भरती परिपत्रक.pdf

केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम Link

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम