राज्यात पुढील वर्षीपासून केरळ पॅटर्न ; वर्ग तिसरी ते आठवी परीक्षा पुन्हा सुरू होणार! Kerala pattern from next year in the state; Class 3rd to 8th exam
राज्यात पुढील वर्षीपासून केरळ पॅटर्न ; वर्ग तिसरी ते आठवी
परीक्षा पुन्हा सुरू होणार!
Kerala pattern from next year in the state; Class 3rd to 8th exams will start again!
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल
घडवून आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार राज्यात आता शिक्षणाचा ‘केरळ
पॅटर्न’ (Kerala pattern) राबविणार आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची
वार्षिक सराव परीक्षा सुरू करणार आहे.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा
घेण्यात येतील. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून
विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात पाठविले जात आहे.
काही खासगी शाळा वगळता सरकारी शाळांमध्ये परीक्षा घेतली जात
नसल्यामुळे विद्यार्थांमध्ये अभ्यासाची गोडी राहिली नाही. नापास होणारच नाही; तर
अभ्यास कशासाठी करायचा, अशी मानसिकता तयार झाल्यामुळे
त्यांचे वाचनही कमी झाले आहे.
भविष्यातील धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी राजस्थान, गुजरात
आणि केरळमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत आहे.
असा आहे केरळ पॅटर्न
- १) प्राथमिक शाळा चालविण्याचे व नोकरभरतीचे अधिकार ग्रामपंचायतींना.
- २) माध्यमिक शाळांचे अधिकार जिल्हा परिषदांना.
- ३) प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा.
- ४) कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा.
- ५) दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल.
- ६) प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक, वडील
आणि माता असोसिएशन.
- ७) विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी कुटुंबश्री योजना.
- ८) विभागीय स्तरावर कला आणि विज्ञान मेळावा.
- ९) विद्यार्थी लेखकास प्रोत्साहन.
- १०) जनावरांच्या डॉक्टरांच्या नियुक्तीचे अधिकारही ग्रामपंचायतींना.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS