⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

NISHTHA 4.0 प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण (ECCE) अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक यांचेसाठीच्या प्रशिक्षण

NISHTHA 4.0 प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण (ECCE) अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक यांचेसाठीच्या ऑनलाईन निष्ठा ४.० प्रशिक्षण Online NISHTHA 4.0 Training for Expert Mentors in Early Childhood, Care and Education (ECCE)

NISHTHA 4.0 प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण (ECCE) अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक यांचेसाठीच्या ऑनलाईन निष्ठा ४.० प्रशिक्षण

Online NISHTHA 4.0 Training for Expert Mentors in Early Childhood, Care and Education (ECCE)

शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० -२०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. तसेच सन २०२१-२२ मध्ये निष्ठा २.० अंतर्गत राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. तसेच निष्ठा ३.० (FLN) अंतर्गत इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना राष्ट्रीय स्तरावरील सूचनांनुसार प्रशिक्षित करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण अंतर्गतचे प्रशिक्षकांचे (तज्ञ मार्गदर्शकांचे) प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ पासून आयोजित करण्यात आलेले आहे.

Diksha App चा वापर कसा करावा.

सदरच्या तज्ञ मार्गदर्शकांची जिल्हानिहाय निवड यापूर्वी या कार्यालयाच्या पत्रानुसार करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने CRC, BRC समन्वयक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील अधिकारी, प्रकल्प अधिकारी, ICDS मधील CDPO, पर्यवेक्षक, तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या कार्यालयातील काही अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे सदरचे निष्ठा ४.० (ECCE) हे ऑनलाईन प्रशिक्षण हे उक्त नमूद तज्ञ मार्गदर्शक यांचेसाठीच सुरु होत आहे. या अनुषंगाने राज्यस्तरावर सदरच्या प्रशिक्षकांचा एक Telegram गटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण ०६ मोड्यूल्स चा समावेश असणार आहे. हे सर्व घटकसंच (मोड्यूल्स) हे प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण (ECCE) वर आधारित आहेत.

आवश्यक सुचना खालीलप्रमाणे

प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण (ECCE) अंतर्गत राज्यस्तरीय सुलभकांचे निष्ठा प्रशिक्षण ४.० दिनांक १७.११.२०२२ पासून दीक्षा ॲप वर ऑनलाईन स्वरुपात सुरु होणार आहे. दीक्षा अॅप डाऊनलोड लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app येथे क्लिक करून आपल्या मोबाईल मध्ये दीक्षा अॅप डाऊनलोड करून घ्यावे. दीक्षा अॅपवरील आपल्या प्रोफाईल ला जावून आपली सर्व माहिती व्यवस्थित नोंदवावी.

नावनोंदणी साठी आवश्यक मार्गदर्शक व्हिडीओसाठी https://www.maa.ac.in/NISHTHA4.0 या लिंकवर क्लिक करावे. यात दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी.

सद्यस्थितीत सुलभकांसाठीच असणारे प्रशिक्षण दीक्षा App वर केवळ इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.

सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA App वर दर ३० दिवसांसाठी एकूण २ मोड्यूल्स याप्रमाणे ९० दिवसांमध्ये एकूण ६ मोड्यूल्स पूर्ण करावयाचे आहेत. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.

प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे मोड्यूल्स हे विहित मुदतीमध्ये प्रशिक्षणार्थी यांनी पूर्ण करणे आवश्यक आहेत. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात येत आहे. सुरु झालेल्या प्रथम ०२ घटकसंचाच्या (मोड्यूल्सच्या) लिंक्स देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे.

प्रस्तुत प्रशिक्षणासाठी राज्यातील SCERT/MIEPA अधिकारी, DIET अधिकारी, DPO, CDPO, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, BRC/URC हे राज्यस्तर सुलभक असून सर्वांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी राज्यातील SCERT/MIEPA अधिकारी, DIET अधिकारी, DPO, CDPO, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख,BRC/URC यांचेसाठी ECCE NISHTHA 4.0 हा Telegram गट तयार करण्यात आलेला असून https://t.me/+cH_WHt-UaSw5Yz19 या लिंक वर क्लिक करून

ECCE निष्ठा ४.० प्रशिक्षणासाठी अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांची माहिती लिंक

गटात सहभागी होणेबाबत उपरोक्त सुलभकांना आवाहन करणेत यावे. सदरच्या गटाची लिंक इतरत्र शेअर करू नये याची नोंद घ्यावी.

सन २०२२-२३ या वर्षात फक्त उपरोक्त तक्त्यातील सुलभकांचे दीक्षा प्रणालीवर ऑनलाईन प्रशिक्षण होईल व संबंधित सुलभकांच्या मदतीने पुढील वर्षात २०२३-२४ मध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी ताई व सेविका यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कृपया आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक अथवा अंगणवाडी ताई व सेविका यांना या ग्रुपला जॉईन करू नये.

सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती यापूर्वीच करण्यात आलेली आहे.

 

या प्रशिक्षणाबाबत आपणास काहीही अडचण/शंका असल्यास खालील क्रमांकांना संपर्क करणेत यावा.

१. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, आय.टी. विभाग, प्रस्तुत कार्यालय - ९१४५८२५१४४

२. लक्ष्मण सुपे, उपविभागप्रमुख, ECCE विभाग, प्रस्तुत कार्यालय - ९६५७९८७५३१

३. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, प्रस्तुत कार्यालय - ८२०८८७९१५९

४. रावसाहेब भामरे, प्राथमिक शिक्षक, लातूर, प्रस्तुत कार्यालय - ८८३०२००४६०

तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा ४० प्रशिक्षण DIKSHA अॅपच्या माध्यमातून प्रशिक्षकांनी पूर्ण करणेसाठी सर्व संबंधितांना अवगत करण्यात यावे, तसेच आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.

nishtha training.nishtha training for teachers,nishtha training module 10 answer key,nishtha training registration link,nishtha training module,nishtha training schedule 2022,nishtha training module pdf download

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे प्रशिक्षण कोर्स लिंक्स

English : -

Course 1 : -

NISHTHA_ECCE_Course1_Eng_Significance of the Early Years-B1 https://diksha.gov.in/learn/course/do31366965695979520011 855

Course 2: -

NISHTHA_ECCE_Course2_Eng_Planning a Play-Based Learning Environment-B1

https://diksha.gov.in/learn/course / do 31366967345925324811 922

Hindi : - Course 1 :

प्रारंभिक वर्षों का महत्व NISHTHA_ECCE_Course1_Hin_प्रारंभिक वर्षों का महत्व_B1 : - https://diksha.gov.in/learn/course / do 31366966387578470411 887

Course 2 : -

खेल-आधारित सीखने के परिवेश का नियोजन

https://diksha.gov.in/learn/course / do 31366968640251494411 980

NISHTHA 4.0 ऑनलाईन प्रशिक्षण परिपत्रक

nishtha training.nishtha training for teachers,nishtha training module 10 answer key,nishtha training registration link,nishtha training module,nishtha training schedule 2022,nishtha training module pdf download

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम