⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयज्ञान व अध्यापन पद्धतीचे गरजाधारित प्रशिक्षण गरजा निश्चित करण्यासाठी माहिती संकलित

मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयज्ञान व अध्यापन पद्धतीचे गरजाधारित प्रशिक्षण गरजा निश्चित करण्यासाठी माहिती संकलित

मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयज्ञान व अध्यापन पद्धतीचे गरजाधारित प्रशिक्षण गरजा निश्चित करण्यासाठी माहिती संकलित

प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी लिंकद्वारे माहिती संकलित करणेबाबत.

प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसाठी विषयानिहाय आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी माहिती संकलन साधनाद्वारे माहिती संकलित करण्यात येणार आहे. या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण निर्मिती केली जाणार आहे.

सदर प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची माहिती मागविण्यात येत आहे. तरी आपल्या अधिनस्त जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षक यांना https://tinyurl.com/teacherassesmentinfo या लिंकवर अथवा सोबत दिलेल्या QR Code द्वारे दि.१० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत माहिती भरण्यासाठी आदेशित करण्यात यावे.

गरजाधारित प्रशिक्षण कार्यक्रम : माहिती पत्रक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत विविध विषयांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. प्रशिक्षण शिक्षकांच्या गरजानुसार दिले तर शिक्षकांना त्याचा अधिकाधिक उपयोग करता येतो. आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षणाची आखणी केली तर प्रशिक्षण अधिक दर्जेदार होऊन त्याची उपयोगिता अधिक प्रमाणात वाढेल. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसाठी आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित गरजा निश्चित करून प्रशिक्षणाची आखणी संदर्भातील कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.

उद्देश :

  • १. शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आशयज्ञान व अध्यापन पद्धती विषयक प्रशिक्षण गरजांचा शोध घेणे.
  • २. प्रशिक्षण विषय गरजांचा शोध घेण्यासाठी साधनसंच विकसित करणे.
  • ३. साधनसंच इच्छुक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून सोडवून घेणे.
  • ४. साधनसंच सोडवणाऱ्या इच्छुक शिक्षक व मुख्याध्यापक यांची माहिती गुगल फॉर्म द्वारे राज्यस्तरावर एकत्रित करणे.
  • ५. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून सोडवून घेतलेल्या साधनसंचाचे विश्लेषण करून गरजा निश्चित करणे.
  • ६. गरजानुसार प्रशिक्षणाची आखणी करणे.

कार्यपद्धती :

शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आशयज्ञान व अध्यापन पद्धती विषयक प्रशिक्षण गरजा निश्चित करण्यासाठी खालील कार्यपद्धती असणार आहे :

१. शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी प्रशिक्षण विषयक गरजांचा शोध घेण्यासाठी स्तरानुसार साधनसंच विकसित केले जाणार आहेत.

।. प्राथमिक स्तर ( पहिली ते पाचवी) : सर्व समावेशक एक साधनसंच असेल. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, परिसर अभ्यास, गणित या विषयांचा समावेश असून सर्व विषयांसाठी प्राथमिक स्तरासाठी एकच साधन संच विकसित केला जाणार आहे.

॥. उच्च प्राथमिक स्तर (सहावी ते आठवी) : सर्व समावेशक एक साधनसंच असेल. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांचा समावेश असून सर्व विषयांसाठी उच्च प्राथमिक स्तरासाठी एकच साधन संच विकसित केला जाणार आहे.

III. माध्यमिक स्तर (नववी ते दहावी) : यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र या प्रत्येक विषयासाठी एक साधनसंच विकसित केला जाणार आहे.

२. ३.राज्यस्तरावर कार्यशाळेचे आयोजन करून तज्ज्ञांच्या मदतीने सदर साधनसंच विकसित करण्यात येणार आहे.

यानंतर सदर साधनसंच इच्छुक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून सोडवून घेण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक शिक्षक व मुख्याध्यापक यांची माहिती राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत गुगल फॉर्मद्वारे संकलित केली जाणार आहे.

४. तत्पूर्वी राज्यस्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), सर्व यांची एक दिवसीय सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेमध्ये प्राचार्य, डायट यांना गुगल फॉर्मद्वारे प्राप्त झालेले इच्छुक शिक्षक व मुख्याध्यापक यांची जिल्हानिहाय यादी व त्याप्रमाणात साधनसंच पुरवण्यात येतील. तसेच सदर साधन संच सोडवून घेण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे.

५. जिल्हास्तरावर डायट मार्फत एक किंवा एकापेक्षा अधिक मध्यवर्ती केंद्राची निवड करून यामध्ये शिक्षक व मुख्याध्यापक यांची बैठकी व्यवस्था करून त्यांच्याकडून सदर साधनसंच सोडवून घेण्यात येणार आहे.

६. सोडवलेले साधनसंच डायट स्तरावर एकत्रित करून विश्लेषण केले जाणार आहे.

७. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे दोन दिवशीय कार्यशाळा घेऊन विश्लेषण करून आलेल्या निष्कर्षांवर प्रत्यक्ष चर्चा करून शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या प्रशिक्षणाची गरज निश्चित केली जाणार आहे.

स्वेच्छेने सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना आवाहन करण्यात येते की सदर साधनसंच सोडवण्यासाठी https://tinyurl.com/teacherassesmentinfo या लिंकवर अथवा सोबत दिलेल्या QR Code द्वारे दि.१० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आपला सहभाग नोंदवावा. 

गरजाधारित प्रशिक्षण गरजा निश्चित करण्यासाठी माहिती संकलित.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम