⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन,Reading and writing numbers up to ten digits,शिष्यवृत्ती परीक्षा

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन

संख्यालेखन करताना आपण दशमान पद्धतीचा वापर करतो.  एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे दहा पटीने वाढत जाते.  

खालील तक्त्याचे निरीक्षण करा.

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन

वाचनाची पद्धत   :

1.       कोणत्याही संख्येचे वाचन करताना,

2.     उजवीकडून गट करून वाचल्यास सोईचे जाते.

3.     शतकदशकएकक हा गट क्र.

4.     यानंतर डावीकडे 2- 2 स्थानांचा गट करावा.

उदा. 15,475 ही संख्या वाचताना पंधरा हजार चारशे पंचाहत्तर अशी वाचतात.

पुढील काही संख्या व त्यांचे वाचन दिले आहे ते अभ्यासा.

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

संख्यालेखन 

          संख्या अंकात लिहितानाप्रथम सर्वात मोठया स्थानावरील अंक लिहावा नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील योग्य अंक लिहावा.

          एख्यादया  स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर '0'   हा अंक लिहावा.

 उदा.   सात कोटी तीनशे चौदा:  या संख्येत;   कोटी स्थानावर 7 लिहून दशलक्षलक्दशहजार,  हजार या प्रत्येक स्थानांवर  '0'  लिहावे लागेल आणि मग  3, 1, 4  हे अंक अनुक्रमे श. , द. , ए.  या स्थानी लिहावे.याप्रमाणे संख्या अंकात लिहिण्याचा सराव करा.

उदा.      1)   चार अब्ज तेरा कोटी पंधरा लक्ष चोवीस हजार एकशे बारा ही संख्या अंकात लिहा.

       उत्तर :  4, 13, 15, 24,112

             2)  पन्नास कोटी पन्नास

       उत्तर :  50, 00,00,050

            संख्यांमध्येडावीकडील प्रत्येक स्थान 10 पटीने वाढत जाते तर उजवीकडील प्रत्येक स्थान 10  पटीने कमी होत जाते.

उदा. 1 दशलक्ष =  1 लक्ष X 10

तसेच; 1 कोटी =  1 दशकोटी ÷ 10 

सव्वा,  साडे,  पावणे

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

संख्यावाचन 1 ते 100

·        दशमान पध्दतीमध्ये 0 ते 9 अशा अंकांच्या 10 खुणा आहेत. 9 नंतर येणा-या 10 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत 10 आहे असे मानले जाते.

·        त्यामुळे 10 या संख्येचे वाचन एक दशकअसे करणे अधिक योग्य ठरेल. मात्र आपण व्यवहारात या संख्येचे वाचन दहाअसेच करतो.

·        याप्रमाणेच 10 च्या पुढील संख्यांचे वाचन करता येईल

·        11 = एक दशक, एक एकक

·        12 = एक दशक, दोन एकक

·        35 = तीन दशक, पाच एकक

·        97 = नउ दशक, सात एकक

·        मात्र व्यवहारात 1 ते 100 या संख्यांसाठी वेगवेगळी नावे आहेत. उदा. 11 = अकरा, 12 = बारा, 35  = पस्तीस, 97  = सत्याण्णव.

·        ही व्यावहारिक नावे म्हणत असतानाच या संख्यांची किंमत दर्शविणारी नावेही लक्षात ठेवावित.

संख्यावाचन 1 ते 1000

·        99 ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.

·        99 = 9 दशक, 9 एकक.

·        यानंतरची संख्या 100. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत 100 किंवा “1 शतकएवढी आहे.

·        शतकी संख्यांचे वाचन करताना शतकस्थानच्या अंकापुढे शेजोडून दशक-एकक स्थानच्या अंकांनी मिळून बनलेली संख्या त्यापुढे वाचतात.

उदा.

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

संख्यावाचन 1 ते 100000

·        999 ही तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.

·        999 = 9 शतक, 9 दशक, 9 एकक.

·        यानंतरची संख्या 1000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत एक हजारएवढी आहे.

·        9999 ही चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे.

·        9999 = 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.

·        यानंतरची संख्या 10000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत दहा हजारएवढी असते.

·        संख्यांचे वाचन करताना दहा हजारहजारया स्थानांवरील संख्यांचे एकत्रित वाचन केले जाते.

उदा.

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

9002 = 9 हजार, 0 शतक, 0 दशक, 2 एकक. यामध्ये शतक व दशक स्थानचा अंक 0 असल्याने त्याचे वाचन होत नाही. मात्र मनामध्ये ही संख्या वाचताना नउ हजार, शून्यशे, शून्य-दोन अशी वाचणे फायद्याचे ठरेल.

संख्यावाचन 1 ते 10000000

·        99,999 ही पाचअंकी सर्वात मोठी संख्या आहे.

·        99,999 = 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.

·        यानंतरची संख्या 1,00,000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत एक लाखएवढी असते.

·        9,99,999 ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे.

·        9,99,999 = 9 लाख, 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.

·        यानंतरची संख्या 10,00,000 असते. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत दहा लाखएवढी असते.

·        संख्यांचे वाचन करताना दहा लाखलाखया स्थानांवरील अंकांचे वाचन एकत्र केले जाते.

उदा.

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

9200025 – ?

 

·        यानंतर मनात वाचन करताना ही संख्या ब्याण्णव लाख, शून्य-शून्य हजार, शून्यशे पंचवीस अशी वाचावी. प्रत्यक्ष वाचन करताना शून्य किंमत असणा-या स्थानांचे वाचन करु नये.

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन नोट्स.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम