⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित नवीन तरतूदी

शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित नवीन तरतूदी Revised New Provisions for Recruitment of Teachers

शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित नवीन तरतूदी
Revised New Provisions for Recruitment of Teachers

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीयामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात, पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल / सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त, शिक्षण यांच्या दिनांक १२.१०.२०२२ रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/ प्र.क्र.१४९/टिएनटि-१, दि.०७.०२.२०१९ यामधील काही तरतूदी वगळणे/सुधारणा करणेबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतूदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/वगळणे व नवीन तरतूदी

शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मधील पुढील तरतूदी सुधारित करण्यास व वगळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१. शासन निर्णय क्रमांक: सीईटी२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दि.०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र.३.४ येथील एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील,” या तरतूदी ऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीतअसे समाविष्ट करण्यात येत आहे.

२. शासन निर्णय क्रमांक: सीईटी२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र. ३.६ येथील तरतूद यान्वये वगळण्यात येत आहे. परंतु उर्वरित तरतूदी यापुढेही लागू राहतील.

०३. पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतूदी समाविष्ट करण्यात येत आहेत:

  • ०१. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि, सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे.
  • ०२. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
  • ०३. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीकरीता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील. या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • ०४. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती घेण्यात येतील. त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहीरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन निहाय यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  • ०५. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.

 शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित नवीन तरतूदी.pdf

संदर्भ - शासन निर्णय संकेताक २०२२१११०१५५१०८४४२१

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम