⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

STARS: MIEPA प्रकल्प: मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण

STARS: MIEPA प्रकल्प: मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण STARS: MIEPA Project: Principal Empowerment Training

STARS: MIEPA प्रकल्प: मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण
STARS: MIEPA Project: Principal Empowerment Training

स्टार्स प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी

स्टार्स प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करणे

राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहायीत, केंद्र पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for States (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२-२३,२०२३-२४ मध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहे. सदर उपक्रमाअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये उर्वरित (आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या) आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या (पदाचे/प्रभारी) यांनी पुढे दिलेल्या लिंकवर दि.३०/०६/२०२४ या तारखेपर्यंत नोंदणी करणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.

नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कुणी भरावी याबाबत महत्वाची सूचना -

  • १. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर (पदाचे / प्रभारी) कार्यरत व्यक्ती
  • २. प्रथम वेळी नोंदणी करणारे
  • ३.पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाईन प्रशिक्षणास सुरुवात न केलेले
  • ४.नोंदणी करताना ईमेल आय-डी, संपूर्ण नाव (SPELLING), जिल्हा ही माहिती काळजीपूर्वक भरावी. आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आयडी द्वारेच होणार आहे.
  • ५.लिंक मधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेतच भरावी.

सदर प्रशिक्षणात पूर्वचाचणी, फेज-1, फेज-2, फेज-3, उत्तरचाचणी, स्वाध्याय, प्रात्यक्षिक, PLC- व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे. खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन लिंक

प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्यासाठी लिंक (Link)
  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम