⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम | Activities under Vidya Amrit Mahotsav

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम  Activities under Vidya Amrit Mahotsav

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम
Activities under Vidya Amrit Mahotsav

शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत प्रती वर्षी दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षकपर्व उपक्रम साजरा केला जातो. सन २०२२-२३ साठी दि. ६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये शिक्षकपर्व उपक्रम घेण्याविषयी सूचित करण्यात आले होते. या अंतर्गत “Demonstration of Innovative Pedagogy for teachers in every school”, Item Bank / प्रश्न पेढी निर्मिती, Uploading of Videos on Innovative Pedagogy by the Teacher on Vidya Amrit Portal हे उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या माध्यमातून समन्वयाने संपूर्ण राज्यभर यापूर्वीच राबविलेले आहेत.

शिक्षक पर्व कार्यक्रमातील तिसरा उपक्रम म्हणजे माईक्रो इम्प्रूमेंट एलइडी इंनोवेटिव्ह पेडागॉजी स्पर्धा होय. या उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांमार्फत शालेय स्तरावर घेण्यात येत असलेल्या अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतींचे चित्रफिती (Video) दीक्षा अॅपवर मागविण्यात येत आहेत. यातून उत्कृष्ट अध्यापन पद्धती वापरणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरून सन्मानित करणेत येणार आहे.

सदर उपक्रम कार्यवाहीबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

* उपक्रम ३- अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतींचे चित्रफिती (Video) सादर करण्यासाठीच्या सूचना

अध्यापनशास्त्र हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा गाभा आहे. तणावमुक्त वातावरणामध्ये अध्ययन घडून यावे यासाठी विविध पद्धतींमागील अध्यापनशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे. आजपर्यंत व्याख्यान पद्धती, पाठ्यपुस्तक केंद्रित चर्चा व खडू- फळा यांच्याशी संबंधित पद्धतींचा वापर केला जात आहे. या पद्धती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी खूप कमी प्रमाणात प्रभावी ठरतात असे बरीच संशोधने सांगतात. परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा व संदर्भ यानुसार अध्यापनशास्त्राचा वापर करतात किंवा स्वतः असे अध्यापनशास्त्र विकसित करतात त्यास नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र असे संबोधता येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या अध्ययन अध्यापनाच्या गरजा आणि येणारे नवीन विचार प्रवाह यांचा विचार करून अध्ययनार्थी केंद्रित अध्ययन अध्यापनशास्त्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.यादृष्टीने शिक्षकांना अशा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्याचे अध्यापनशास्त्र याविषयी मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनामध्ये त्यांचा वापर व्हावा यासाठी सदर उपक्रम राष्ट्रीय स्तरावरून आयोजित करण्यात आला आहे. यावर आधारित माईक्रो इम्प्रूमेंट एलइडी इंनोवेटिव्ह पेडागॉजी स्पर्धा या विषयाशी संबंधित स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय स्तरावरून करण्यात येत आहे.

उद्देश :

अध्ययनार्थ्याला आनंददायी पद्धतीने त्याच्या गरजांचा विचार करून तसेच त्याच्या सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करून बहुविद्याशाखीय, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देणाऱ्या अध्ययनअध्यापन पद्धतींचे शिक्षकांना ज्ञान व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

सत्र आयोजन कालावधी : याबाबतचे पत्र अथवा V.C. द्वारे सूचना मिळाल्यापासून दि. १० डिसेंबर २०२२ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

उपक्रमाची कार्यपद्धती :

सदर उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे.

याकरिता डायट मार्फत एक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे. सत्राचा कालावधी १ तासाचा असेल.

सदर सत्रासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील आय. टी. विभागातील प्राचार्य/ वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता/विषय सहायक हे स्वतः मार्गदर्शन करतील.

सदर उपक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात यावे.

सदर चित्रफिती (Video) हे कोणत्याही अध्ययन-अध्यापनाशी निगडीत कोणत्याही विषयाच्या निवडलेल्या घटकावर आधारित असावे.

तसेच सदर सत्रासाठी नाविन्यपूर्ण, आनंददायी तसेच अध्ययनार्थ्याला गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतींचा वापर करावा.

सत्र आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत तयार करण्यात यावे.

जिल्ह्यातील शिक्षकांना चित्रफिती (Video) अपलोड करण्याविषयी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत मार्गदर्शन देण्यात यावे. तसेच नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची माहिती देण्यात यावी. यामध्ये ज्ञानरचनावाद,सहकार्यात्मक अध्ययन, सहाध्यायी अध्ययन, अनुभवात्मक अध्ययन, खेळ आधारित अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेशित अध्यापन पद्धती, डिजिटल अध्ययन, पृच्छा पद्धती, स्वयंअध्ययनास चालना देणाऱ्या अध्यापन पद्धतींचा समावेश असावा.

त्यानुसार तज्ञ मार्गदर्शकांना नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र संकल्पना,नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्यामागील अध्यापनशास्त्र,त्यांचा अध्ययन-अध्यापनातील वापर, त्यातून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांची सविस्तर माहिती देण्यात यावी . कोणत्याही एका नाविन्यपूर्ण पद्धतीवर आधारित किमान ०५ मिनिटे कालावधीचा डेमो चित्रफिती (Video) दाखविण्यात यावे.

अधिक माहितीसाठी

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत व्हिडिओ दीक्षा अँपवर अपलोड करण्याची पद्धत 

सदर नियोजन करीत असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, निवडण्यात आलेल्या विषयाशी संबंधित अध्यापनशास्त्र यांचाही विचार करावा.

सदर उपक्रमाचा कालावधी दिनांक १९.११.२०२२ ते १० डिसेंबर २०२२ असा आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकास दिनांक १० डिसेंबर २०२२ पर्यंत आपली चित्रफित (Video) दीक्षा अॅप वर अपलोड करता येतील.

चित्रफित (Video) दीक्षा App वर अपलोड करणेबाबत सूचना:

सर्वप्रथम शिक्षकांनी आपल्या मोबाईल मध्ये दीक्षा अॅप (DIKSHA) डाऊनलोड करून घ्यावे.

दीक्षा अॅपवरील आपल्या profile मधील माहिती अद्ययावत करून घ्यावी.

अपलोड करावयाची चित्रफित (Video) size २० mb असून वेळ ५ मिनिटे असावी.

चित्रफित (Video) मध्ये कुठेही वय, लिंग, जात, धर्म, वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, दिव्यांगत्व याबाबत चुकीचे शब्दप्रयोग वापरण्यात येवू नये.

चित्रफित (Video) अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी असावी. प्रत्यक्ष चित्रफित (Video) अपलोड करावयाची आहे. त्यामुळे चित्रफित (Video) समाज माध्यमावरील लिंक अपलोड करू नये.

सदर सत्राचे फोटो किंवा व्हिडिओ #SchoolSawareinHum, #Microlmprovements, #VidyaAmrit, #MyNeighbourhoodSchools, #VidyaAmritMahotsav, #TeachersareLeaders, #lforInnovation #innovativepedogogy आणि #scertmaharashtra या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करावेत तसेच SCERT फेसबुक पेज व ट्वीटर हंड्ल ला टॅग करण्यात यावे.

तालुका स्तरावर (गट शिक्षणाधिकारी) ३ सदस्यीय निवड समिती तयार करून अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी चित्रफित (Video) विकसन करणाऱ्या उत्कृष्ट १-२ शिक्षकांचा गौरव करण्यात यावा.

जिल्हा स्तरावर (डाएट) ३ सदस्यीय निवड समिती तयार करून अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी चित्रफित (Video) विकसन करणाऱ्या उत्कृष्ट २-३ शिक्षकांचा गौरव करण्यात यावा.

राज्य स्तरावर (SCERT) ३ सदस्यीय निवड समिती तयार करून अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी चित्रफित (Video) विकसन करणाऱ्या उत्कृष्ट १५ शिक्षकांचा गौरव करण्यात यावा. व त्यापैकी ०३ शिक्षकांची शिफारस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रक्रियेसाठी करण्यात यावी.

उत्कृष्ट चित्रफित (Video) निवडण्यासाठी पुढील ३ गोष्टी गृहीत धरण्यात याव्यात.

१. प्रस्तुत चित्रफित (Video) किती वेळा पाहण्यात आलेली आहे

२. चित्रफित (Video) पाहण्याचा सरासरी वेळ

३. चित्रफितीस प्राप्त (Video) रेटिंग

उपरोक्त प्रमाणे करावयाच्या कार्यवाहीबाबतची सर्व आवश्यक माहिती जतन करून ठेवण्यात यावी जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनेनुसार सर्व माहिती विहित कालावधीमध्ये भरणे शक्य होईल.

सदर उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे संपर्क करावा,

१. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, आय.टी. विभाग, प्रस्तुत कार्यालय - ९१४५८२५१४४ २. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, प्रस्तुत कार्यालय - ८२०८८७९१५९ 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम