⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महात्मा जोतीराव फुले संपूर्ण मराठी माहिती

महात्मा जोतीराव फुले,महात्मा जोतीराव फुले माहिती मराठी, महात्मा जोतीराव फुले माहिती मराठी,महात्मा जोतिबा फुले मराठी माहिती

महात्मा जोतीराव फुले संपूर्ण मराठी माहिती

महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक, भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणतात. फुले हे पहिले समाजसुधारक होते. त्यांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली.

जोतीराव जोतीराव यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे होते. वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव (गोऱ्हे होते. १८२७ ला जोतीरावांच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव 'ज्योतिबा' ठेवले होते.

शिक्षण १८३४ मधे जोतीराव मराठी शाळेत गेले. १८३८ मधे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. १८४० ला त्यांचा विवाह सावित्रीबाई फुल्यांशी झाला. गफ्फार बेग मुनसी या मुस्लीम विद्वानाने व ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेजीट साहेब यांनी जोतीराव व त्यांच्या वडिलांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश केला. त्यामुळे गोविंदरावांनी १८४१ मधे वयाच्या १४ व्या वर्षी जोतीरावांना स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेत घातले.

स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे हे ब्राह्मण मित्र भेटले तसेच वासुदेव बाबाजी नवरंगे व उस्मान शेख हेही मित्र भेटले. सदाशिव बल्लाळ गोवंडे हे आयुष्यभर त्यांचे मित्र बनून राहिले.

याच काळात लहूजी बुवा साळवे (मांग) यांच्याकडे महात्मा फुले दांडपट्टा, ढाल-तलवार, मल्लविद्या, नेमबाजी व गोळीबार करण्याचे शिक्षण घेत होते.

थॉमस पेन च्या 'राईट ऑफ द मेन' या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी व सदाशिव गोवंडे या दोघांनी शिवाजी महाराज व जॉर्ज वाशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास केला होता. कबीराच्या बीजक ग्रंथातील 'विप्रमति' या प्रकरणाचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्वतःचा उल्लेख एका ठिकाणी त्यांनी 'कबीर साधूच्या पंथाचा' असा केला आहे. त्यांनी वेद, साहित्य, पुराणे यांचाही अभ्यास केला. अनेक संस्कृत ग्रंथ वाचले ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला. महात्मा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती या भाषा येत असत.

त्याच्या गुरुकन्येचे ९ व्या वर्षी विधवा होऊन मुंडन झालेले; तिचे हाल पाहून फुल्यांना आघात बसला. याच वर्षी ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत त्यांचा अपमान झाला होता.

स्त्रियांविषयी कार्य

त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने त्यांची स्थिती वाईट होती. 'स्त्रियांना मानवी हक्कांची जाणीव होऊ नये या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध केला, असे मत त्यांनी मांडले.' महात्मा फुल्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री-शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला.

महात्मा फुले यांनी ऑगस्ट १८४८ मधे बुधवार पेठ, पुणे येथे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या कामात त्यांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, जगन्नाथ सदशिवजी हाटे, आण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, बापूसाहेब मांडे व मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी सहकार्य केले.

या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिकेची कामे करू नये म्हणून ब्राह्मण लोकांनी त्यांचा फार छळ केला. पण त्यांनी शिकवणे बंद केले नाही, शेवट सनातनी लोकांनी या बाबत जोतीरावांच्या वडिलांकडे तक्रार केली. समाज दडपणात गोविंदरावांनी सावित्रींना न जाण्याची आज्ञा केली. जोतीरावांना हे न पटल्यामुळे > शेवटी मतभेद झाल्याने दोघांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गंज पेठेत (आधुनिक फुले पेठ) एका घरात (क्र. ५७२) राहण्यास त्यांनी सुरुवात केली.

या स्थितीत सुरू केलेली शाळा बंद पडली. ती सदाशिव गोवंडे यांच्या जुनागंज पेठेतील जागेत प सुरू केली. ३ जुलै १८५१ रोजी जोतीरावांनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली.

महात्मा फुले यांनी १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली तर १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. मुलींची शाळा चालवण्यासाठी जोतीरावांना सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर व देवराम ठोसर या ब्राह्मण मंडळींचे आर्थिक सहकार्य मिळाले. सौ. इ. सी. जोन्स यांनीही जोतीरावांना मदत केली. विष्णुपंत थत्ते यांनी जोतीरावांना काढलेल्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिकेची कार्य कसे करावे याविषयी शिक्षण देण्याचे काम केले.महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८८२ मधे स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला.

बालहत्या प्रतिबंधक गृह

महात्मा फुले यांनी ( १८६३ बालहत्या स्थापन केले. या ठिकाणी जन्म झालेल्या मुलांची सेवा करण्याचे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी केले. काशीबाई या ब्राह्मण विधवा स्त्रीचा मुलगा यशवंत याला फुले दाम्पत्याने दत्तक घेतला (१८७३).या गृहाच्या दारावर पाटी होती, 'विधवांनी येथे या.' सुरक्षितपणे बाळंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल, मुलांचे संगोपन केले जाईल."

 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या कार्याचा प्रभाव लोकहितवादी, लाल शंकर, उमा शंकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर पडला, त्यांनी या कार्याला पाठींबा दिला. त्यांनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.

विधवा विवाह

महात्मा फुले यांच्या प्रेरणेने ८ मार्च १८६४ रोजी पुणे येथे गोखले यांच्या बागेत एका शेणवी जातीतीतील अठरा वर्षांच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विदुराबरोबर करण्यात आला. हा पहिला पुनर्विवाह.

महात्मा फुले यांचे मित्र व त्यांच्या शिक्षणसंस्थेतील एक सभासद विष्णूशास्त्री पंडित यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून विधवा विवाहास उत्तेजन देण्याचे कार्य सुरू केले.

बहुपत्नीत्व, बालविवाह, जरठविवाह, केशवपन व वाघ्या मुरळी या सर्व प्रथांना महात्मा फुले यांनी विरोध केला.

न्हाव्यांचा संप

सावित्रीबाई फुल्यांच्या प्रेरणेने विधवांच्या केशवपनाला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप घडवून आणला. यात नारायण मेघाजी लोखंडे सहभागी झाले होते.

 

दलित अस्पृश्यांसाठी शाळा (१८५१)

१८५१ मधे पुणे शहरात नानापेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. नंतर सनातनी मंडळींनी ती बंद पाडली. १८५२ मधे पुणे शहरात वेताळपेठेत सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात अस्पृश्यांसाठी पुन्हा शाळा सुरू केली. यात मात्र विद्यार्थी हळूहळू वाढत गेले. अशा शाळांना दक्षिणा फंडातून महिन्याला २५ रुपये मदत म्हणून देण्यात येऊ लागले. लहूजी साळवे व राणोजी महार यांनी महार मांग वाड्यात जाऊन मुलांना शाळेत आणण्याचे काम केले.

विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर राघो सुखराम, धुराजी अप्पाजी चांभार, केसो त्र्यंबक, विठोबा बापूजी, विनायक गुणेश, धोंडो सदाशिव, गुणू राझुजी, ग्याणु शिवजी व गणू शिवाजी मांग यांनी दलितांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्य केले.

अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी १८६८ मधे स्वतःच्या वाड्यातील विहीर व हौद खुले केले. तसेच दलितांसाठी पहिले वाचनालय देखील सुरू केले स्थापन केली.

प्रौढ शिक्षण

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १८५५ मधे रात्रीची शाळा सुरू केली. ही शाळा त्यांनी स्वतःच्याच घरी सुरू केली. या शाळेत दोघेही रोज प्रौढ लोकांना शिकवत असत.

२४ सप्टेंबर १८७३ मधे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

महात्मा फुले एक Contractor खडकवासला येथील तलावाच्या कामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट सरकारकडून फुल्यांनी घेतले होते. सखाराम यशवंत परांजपे हे त्यांचे पार्टनर होते. या कामाच्या दोन-तीन वर्षांच्या काळात मजुरांशी महात्मा फुल्यांचे जवळून सबंध आले. येरवडा येथील पुलाच्या कामासाठी चुना पुरवण्याचे काम देखील फुल्यांनी घेतले. या वेळी त्यांना सरकारी कामाचा आतून अनुभव आला. इंजिनिअर खात्यातील बेशिस्त कार्यावर त्यांनी एक टीकात्मक पोवाडा लिहिला.  

राष्ट्रीय काँग्रेस व महात्मा फुले - काँग्रेसचे नेते जोपर्यंत महार, मांग व शेतकऱ्यांच्या हिताची कळकळ बाळगत नाहीत व त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आदर बाळगत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय सभा ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होऊ शकत नाही असे त्यांचे मत होते. राष्ट्रीय सभा ही सर्व धर्मियांची बनवावी असे त्यांचे मत होते.

राष्ट्रीय सभेचे पाचवे अधिवेशन डिसेंबर १८८९ मधे (मुंबई येथे भरले. यावेळी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ फाटक्या कपड्यातील शेतकऱ्याचा पुतळा उभा केला.

भारतीय राष्ट्रीय सभेत एकही शेतकरी नाही. त्यामुळे या सभेचे अधिवेशने तासाआड भरत गेले तरी ते उपयोगाचे नाही.

ब्रिटिश सरकार- ब्रिटिशांच्या राजकीय धोरणांचा त्यांना तिरस्कार होता. त्यामुळे प्रथम कनिष्ठ वर्गातील तरुणांना एकत्रित करून ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण ब्रिटिश सत्तेच्या जाचापेक्षा समाजातील उच्चवर्णीय लोकांनी समाजाचे चालविलेले शोषण प्रथम थांबविले पाहिजे असे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सामाजिक कार्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली. सामाजिक सुधारणांबाबत सरकारच्या तटस्थ वृत्तीवर जोतीरावांचा आक्षेप होता.

इंग्रजांचे राज्य गेले तर पुन्हा पेशवाई येईल या विचारातून १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध फसले याचा त्यांना आनंद झाला.

हंटर आयोगाला निवेदन-लॉर्ड रिपनच्या काळात ३ फेब्रुवारी १८८२ रोजी एका शिक्षण आयोगाची नियुक्ती झाली. महात्मा फुले यांनी ऑक्टोबर १८८२ ला या आयोगाला एक निवेदन दिले त्यात प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे करणे, प्राथमिक शाळांची संख्या वाढवणे, प्राथमिक शिक्षणावर खर्च जास्त करावा व अनुदाने पण सरकारने द्यावीत, या शाळातील शिक्षक प्रशिक्षित असावेत. अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या.पण आयोगाने या सर्व सूचना स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे आयोगाच्या अहवालावर महात्मा फुले समाधानी नव्हते. १८९१ च्या सार्वजनिक सत्यधर्म' या आपल्या पुस्तकात महात्मा फुले म्हणतात, हिंदुतील आर्य ब्राह्मणाखेरीज करून शूद्रातिशूद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांविषयी बिलकुल ज्ञान नाही म्हणून ते तसा वाचाळपणा करत आहेत

शिक्षणविचार महात्मा फुले यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. शिक्षणाच्या अभावी सामान्य माणसाची अवस्था पशुप्रमाणे होते. असे त्यांचे मत होते. इंग्रजांनी मेकॉलेच्या पद्धतीनुसार सुरू केलेल्या शिक्षणपद्धतीला त्यांचा विरोध होता. मूठभर लोकांना शिक्षित करून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही. शिक्षण शूद्रातिशूद्र विद्यार्थ्याला पण घेता आले पाहिजे. थोडक्यात शिक्षण ह सार्वत्रिक व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे असे त्यांचे मत होते.

 

ज्योतिबांविषयी गौरवोद्गार

(१) राजर्षी शाहू "बहुजन समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारे व अर्वाचीन काळी जगविणारे देशातील पहिले पुरुष ज्योतिबा फुले आहेत. तसेच शाहू महाराजांनी त्यांना 'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग संबोधले. "

(२) महर्षी वि. रा. शिंदे यांनी "पतितांचा पालनवाला' म्हटले.

(३)सयाजीराव गायकवाड यांनी "हिंदुस्थानचा वॉशिंग्टन' अशी पदवी दिली.

(४) लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांना 'म. फुले हे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष म्हटले.

(५) आंबेडकरांनी त्यांना 'Who Where the Shudras' हा ग्रंथ फुल्यांना अर्पण केला.

(६) रा. पंढरीनाथ पाटील यांनी "महाराष्ट्रातील पहिला सोशॅलिस्ट" म्हटले.

(७) महर्षी शिंदेंनी त्यांच्या लेखनाला 'रानफळाची' उपमा दिली.

(८) माधव बागल यांनी म. फुले यांना महाराष्ट्राचे 'कार्लमार्क्स' म्हटले.

(९) वि. रा. शिंदे यांनी " रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट" म्हटले.

(१०) महात्मा गांधी – “१९३२ साली लोक मला महात्मा म्हणत होते पण खरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. " 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम