⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | Shabdanchya Jaati

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- शब्दांच्या जाती,शब्दांच्या जाती मराठी व्याकरण,मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 8,मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 8, मराठी व्याकरण pdf,मराठी व्याकरण आठवी pdf,मराठी व्याकरण नोट्स pdf,मराठी व्याकरण नोट्स pdf download, मराठी व्याकरण शब्दांच्या जाती, मराठी व्याकरण नामाची व्याख्या,५वी मराठी व्याकरण नाम उदाहरणे,मराठी व्याकरण नामाचे प्रकार

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- शब्दांच्या जाती

·        शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.

·        बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात.

·        शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो.

·        क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही.

·        विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात.

शब्दांच्या जाती

१.नाम

वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  

फूल, हरी, गोडी इत्यादी     

२.सर्वनाम

जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात.  

उदाहरणार्थ         

मी, तू, हा, जो, कोण इत्यादी  

३. विशेषण

जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात.     

उदाहरणार्थ  

कडू, गोड, दहा, त्याचा इत्यादी. 

४. क्रियापद

जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात.  

उदाहरणार्थ      

बसतो, जाईल, आहे इत्यादी

५. क्रियाविशेषण

जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात.     

उदाहरणार्थ  

आज, काल, तिथे, फार इत्यादी 

६. शब्दयोगी अव्यय

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.  

उदाहरणार्थ        

झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी इत्यादी 

७. उभयान्वयी अव्यय

जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.  

उदाहरणार्थ        

, आणि, परंतु, म्हणून इत्यादी       

८. केवलप्रयोगी अव्यय

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.   

उदाहरणार्थ       

शाब्बास, अबब, अरेरे इत्यादी.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा - शब्दांच्या जाती 

  1. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- नाम
  2. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- सर्वनाम
  3. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- विशेषण
  4. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- क्रियापद
  5. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण- क्रियाविशेषण 
  6. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-शब्दयोगी अव्यय
  7. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-उभयान्वयी अव्यय
  8. शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-केवलप्रयोगी अव्यय

TAG-शब्दांच्या जाती मराठी व्याकरण,मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 8,मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 8, मराठी व्याकरण pdf,मराठी व्याकरण आठवी pdf,मराठी व्याकरण नोट्स pdf,मराठी व्याकरण नोट्स pdf download, मराठी व्याकरण शब्दांच्या जाती, मराठी व्याकरण नामाची व्याख्या,५वी मराठी व्याकरण नाम उदाहरणे

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम