⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

निपुण महाराष्ट्र उत्सव २०२२ | Nipun Maharashtra Utsav 2022

निपुण महाराष्ट्र उत्सव २०२२  | Nipun Maharashtra Utsav 2022

निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बालवाटीका ते इयत्ता ३ रीच्या मुलांना निपुण बनवण्यात मुलांच्या मातांचे वाडी-वस्त्यावर समूह बनविण्यात आलेले आहेत. दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२२ या दरम्यान सर्वच गावात बालदिनाचे औचित्य साधून राज्यभर निपुण महाराष्ट्र उत्सव(Nipun Maharashtra Utsav) राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आपण आपल्या स्तरावरून सर्व जिल्ह्यातील सर्वच अधिकारी वर्ग यांनी माता गटांना भेटी द्याव्यात, त्यांना समजून द्यावे, त्यांच्या अडचणी असल्यास सोडविणेबाबत प्रयत्न करावेत ज्याद्वारे निपुण बालक घडविण्यासाठी सर्वच मातांचा सहभाग होऊन त्यांना प्रोत्साहन मिळेल. आपल्या क्षेत्रातील सर्व अधिकारी या निपुण महाराष्ट्र उत्सवा मध्ये सहभागी होतील यासाठी आपल्या स्तरावरुन प्रयत्न करण्यास विनंती आहे.

निपुण महाराष्ट्र उत्सव २०२२  | Nipun Maharashtra Utsav 2022

भेटी दरम्यान आलेले अनुभव आणि निरीक्षण याच्या नोंदी सदर भेटकर्ते यांनी आपल्या जवळ ठेवाव्यात आणि सोबतच दिलेल्या लिंकवरही भरावी. तसेच सोबत दिलेल्या पोस्टर द्वारे दिलेल्या माहितीचा उपयोग आपण या भेटी दरम्यान आपण करावा.

सदर भेटीदरम्यान आलेले अनुभव व निवडक माता गटांचे घेतलेले बोलके फोटो आणि व्हिडीओ हे विविध प्रसार माध्यमांवर प्रसारित करावेत. प्रसारित करत असताना #FLN #NipunMaharashtra #samagrshikshamh #prathameducationfoundation चा वापर करावा. आपणास बोलके फोटो/व्हिडीओ निपुण महाराष्ट्र http://mhnipun.prathaminsights.in या वेबसाईटवर ऍड करता येईल.

निपुण उत्सव होण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणून सर्व स्तरावर नोडल अधिकारी व प्रथम संस्थाच्या मदतीने निपुण महाराष्ट्र उत्सवबाबत ऑनलाईन (online) उद्भोधन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. 

परिपत्रक डाऊनलोड

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम