⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-सर्वनाम

सर्वनाम मराठी,सर्वनाम मराठी वाक्य,सर्वनाम मराठी उदाहरणे,सर्वनाम मराठी शब्द,सर्वनाम मराठी worksheet,सर्वनाम मराठी व्याख्या,सर्वनाम मराठी अर्थ,मराठी सर्वनाम प्रकार,पुरुषवाचक सर्वनाम मराठी,नाम सर्वनाम मराठी,शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-सर्वनाम

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-सर्वनाम

नामाऐवजी येणा-या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द.

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणा-या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामांचे पुढीलप्रमाणे एकूण सहा प्रकार मानतात.

१. पुरुषवाचक सर्वनाम

२. दर्शक सर्वनाम

३. संबंधी सर्वनाम

४. प्रश्नार्थक सर्वनाम

५. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम  

६. आत्मवाचक सर्वनाम           

पुरुषवाचक सर्वनामे –       

बोलणार्‍याच्या किंवा लिहिणार्‍याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन गट पडतात. पहिला बोलणार्‍याचा दुसरा ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा आणि तिसरा ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचाव्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात.  

या तिन्ही वर्गातील नामांबद्दल येणा-या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.  

अ) बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे  

उदा. :  मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी.  

ब) ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती दवितीय पुरुषवाचक सर्वनामे.  

उदा. :  तू, तुम्ही, आपण, स्वतः  

क) ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे  

उदा. :  तो, ती, ते, त्या.

दर्शक सर्वनामे –  

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात.               

उदा. :   हा, ही, हे, तो, ती, ते.            

संबंधी सर्वनामे –  

वाक्यात पुढे येणा-या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणा-या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात.    

उदा. :   जो-जी-जे, जे-ज्या    

प्रश्नार्थक सर्वनामे –  

ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.  

उदा. :  उदा : कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इ.     

सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे –

कोणकाय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेंव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.  

उदा. :          

अ) कोणी कोणास हसू नये.

ब) या जगाचे काय होईल, कुणास ठाऊक.  

क) जगी सर्वसुखी असा कोण आहे.  

ड) त्या दुकानात काय वाटेल ते मिळते.  

इ) देवाच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार

फ) तिकडे कोण आहे, ते मेला माहीत नाही.  

ग) कोणी यावे, कोणी जावे.  

ह) कोण ही गर्दी.         

आत्मवाचक सर्वनामे –

जेंव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेंव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते यालाच कोणी स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात.

उदा. :   

१. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.

२.नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे.

स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही.  

(अपवाद - स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.)  

आपण हे सर्वनाम आत्मवाचक म्हणून वापरले तर ते देखील नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधाराने येते. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वत: असा होतो, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. आपण व स्वत: ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात, या दोहोंमधील फरक:  

अ) पुरुषवाचक आपण हे केवळ अनेकवचनात येते.  

आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते.  

ब) पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते.  

आत्मवाचक आपण तसे येते नाही.          

क) आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येतेतेव्हा ते पुरुषवाचक असते व स्वत:च्या अर्थाने येतेतेव्हाही ते आत्मवाचक असते.    

'आपणया आत्मवाचक सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम म्हणूनही उपयोग केला जातो आणि ते तीनही पुरुषात व दोन्ही वचनात चालते.  

उदा. :

१. तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही.  

(आपण = मी, प्रथम पुरुष, एकवचन )  

२. आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ.  

(आपण = आम्ही, प्रथम पुरुष, अनेकवचन )

३. शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, 'आपण रडणे थांबवून बोलाल का'? 

(आपण = तू, व्दितीय पुरुष, एकवचन)

४. मी देवळात गेलो तेंव्हा आपण इक़डे घरी आलात का

(आपण = तुम्ही, व्दितीय पुरुष, अनेकवचन )

५. सुरेशने मला शाळेत बोलवले व आपण आलाच नाही.  

(आपण = तो तृतीय पुरुष, एकवचन )

६. नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले.  

(आपण = ते, तृतीय पुरुष, अनेकवचन )     

सर्वनामांचा लिंगविचार :

मराठीत मूळ सर्वनाम ९:  

१. मी

२. तू

३. तो

४. हा

५. जो

६. कोण

७. काय

८. आपण

९. स्वत:              

मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत ती पुढीलप्रमाणे मीतूतोहाजोकोणकायआपणस्वतः इत्यादी  

यातील लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनामे आहेत.     

१. तो : तो-ती-ते  

२. हा : हा-ही-हे  

३. जो : जो-जी-जे        

याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तिन्ही लिंगातील रूप सारखीच राहतात ती बदलत नाहीत.      

मराठीतील मूळ नऊ सर्वनामांपैकी मीतूतोहाजो ही पाच सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.          

१. मी- आम्ही  

२. ते- तुम्ही

३. तो- ती, ते, त्या

४. हा- ही, हे, हया

५. जो- जी, जे, ज्या          

सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आले असेल, त्यावर अवलंबून असते.          

सर्वनामांची संबोधन विभक्ती नसते कारण सर्वनामे ही प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांची हाक मारण्यासाठी योजना होत नाही.  

मूळ शब्द व प्रत्यय यांच्यामध्ये आणखी एक अक्षर येऊन तुझ्यानेतुमच्यांशीतुझ्याहूनतुमच्याहूनतुझ्याततुमच्यात अशी जी रूपे तयार होतात त्यास विकरण असे म्हणतात.         

ही शुद्ध विभक्तीची रूपे नसून यांना सविकारणी विभक्ती असे म्हणतात.

TAG-सर्वनाम मराठी,सर्वनाम मराठी वाक्य,सर्वनाम मराठी उदाहरणे,सर्वनाम मराठी शब्द,सर्वनाम मराठी worksheet,सर्वनाम मराठी व्याख्या,सर्वनाम मराठी अर्थ,मराठी सर्वनाम प्रकार,पुरुषवाचक सर्वनाम मराठी,नाम सर्वनाम मराठी

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम