⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-विशेषण

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-विशेषण,विशेषण मराठी,विशेषण मराठी वाक्य,विशेषण मराठी उदाहरण,विशेषण मराठी उदाहरणे,विशेषण मराठी अर्थ,मराठी विशेषण शब्द list,विशेषण प्रकार मराठी,गुणवाचक विशेषण मराठी,क्रिया विशेषण मराठी,सार्वनामिक विशेषण मराठी

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण-विशेषण

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणा-या शब्दास विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे वैशिष्ट्य हे की , ते नामाबद्ल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते व साधारणपणे नामापुर्वी येते.

विशेषण आणि विशेष्य

विशेषण :  

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण.        

विशेष्य :  

ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात.        

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.     

१. गुणविशेषण  

२. संख्याविशेषण

३. सार्वनामिक विशेषण 

१. गुणविशेषण –              

ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात.  

जसे मोठी मुले, आंबट बोरे, शूर सरदार, रेखीव चित्र, निळासावळा झरा इ.            

उदा:

अलीबागला मोठे धरण आहे.              

वरील वाक्यात मोठे या शब्दाने धरणाचा गुण सांगितला आहे.

२. संख्याविशेषण – 

ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात.       

उदा.

जत्रेला पुष्कळ माणसे आली.

वरील वाक्यात पुष्कळ या शब्दाने माणसांची संख्या दर्शवली आहे.

संख्याविशेषणाचे पुढील प्रकार पडतात.  

अ) गणनावाचक संख्याविशेषण  

आ) क्रमवाचक संख्याविशेषण

इ) आवृत्तीवाचक संख्याविशेषण  

ई) पृथककत्ववाचक संख्याविशेषण  

उ) अनिश्चित संख्याविशेषण

अ) गणनावाचक संख्याविशेषण  

ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

गणनावाचक संख्याविशेषणे अक्षरांनी व अंकांनी लिहितात.

उदा.

दहा मुलीचौदा भाषासाठ रुपयेसहस्त्र किरणेअर्धा तासदोघे मुलगे इत्यादी.

वरील शब्दातील दहा, चौदा, साठ, सहस्त्र, अर्धा, दोघे या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्यास गणनावाचक संख्याविशेषणे असे म्हणतात.

गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार पडतात.

अ. पूर्णांक वाचक -  

एक, दोन, शंभर, , , १०० इ.          

ब. अपूर्णांक वाचक -  

पाव, अर्धा, पाऊन, १/४, १/२, ३/४ इ.  

क. साकल्यवाचक -  

दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारी बहिणी इ.

आ) क्रमवाचक संख्याविशेषण               

ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखविण्यासाठी केला जातो त्यास क्रम वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

पहिला, चौथा, आठवी, साठावे ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात अशा विशेषणांना क्रमवाचक संख्याविशेषणे असे म्हणतात.  

उदा.                

तीसरा बंगला, पहिले दुकान इ.

इ) आवृत्तीवाचक संख्याविशेषणे  

ज्या विशेषणाचा उपयोग किती वेळा याचा बोध करण्यासाठी केला जातो त्यास आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.                

चौपट, दसपट दुहेरी, विगुणीत यासारखी विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात त्यांना आवृत्तीवाचक संख्याविशेषणे असे म्हणतात.         

उदा.

पाचपट रक्कम, चौपदरी घडी इ.

ई) पृथककत्ववाचक संख्याविशेषण  

ज्या विशेषणाचा उपयोग वेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो त्यास पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात.              

एकेक, दहादहा यासारखी विशेषणे वेगवेगळा किंवा पृथक असा बोध करून देतात अशा विशेषणांना पृथकत्ववाचक संख्याविशेषणे असे म्हणतात.       

उदा.              

एकेक विद्यार्थी, वीस - वीसची तुकडी इ.

उ) अनिश्चित संख्याविशेषण                 

जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यास अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा:

सर्व रस्तेथोडी मुलेकाही पक्षीइतर लोक इत्यादी.

वरील शब्दातील सर्व, थोडी, काही, इतर ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत म्हणून त्यांना अनिश्चित संख्याविशेषणे असे म्हणतात.   

३. सार्वनामिक विशेषण                  

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात.  

जी विशेषणे सर्वनामांपासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण म्हणतात.

जसे- हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या इ.           

उदा. :  

मी : माझा, माझी, माझे

तू : तुझा, तुझी, तुझे

नामे, सर्वनामे धातुसाधिते, व अव्ययसाधिते यांचा विशेषणासारखा उपयोग

१. नामसाधित विशेषणे :                 

नामापासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असे म्हणतात.  

वाक्यामध्ये नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात.       

उदाहरणार्थ :                   

तो गाडी विक्रेता आहे.  

(गाडी- मुळ नावविक्रेता - नामाबद्दल  विशेष माहिती)

२. सार्वनामिक विशेषणे  

याची माहिती वरती घेतली आहे.

३. धातुसाधित विशेषणे                 

धातूपासून बनलेल्या विशेषणांना धातुसाधित विशेषणे असे म्हणतात.                

एखाद्या वाक्यामध्ये नामची विशेषणे हि क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात अशा विशेषणाला धातुसाधित विशेषण म्हणतात.         

उदा:               

ती धावणारी मुलगी बघा.                  

धावणारी शब्द मुलगी नामाची विशेषण आहे. त्याचे मुल रूप धाव या क्रियापदाच्या मूळ शब्दापासून तयार झाले आहे.

४. अव्ययसाधित विशेषणे                 

अव्ययापासून बनलेल्या विशेषणांना अव्ययसाधित विशेषणे असे म्हणतात.  

वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्याला अव्ययसाधित विशेषणे म्हणतात.   

उदा:

समोरची खिडकी बंद आहे.  

समोर या शब्दाला ची हा प्रत्यय लागला आहे.

अधिविशेषण व विधीविशेषण विशेषण               

नामापुर्वी येणाच्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात तर नामानंतर येणाच्या विशेषणाला विधीविशेषण असे म्हणतात.

हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी येते.  

उदा.: 

चांगला मुलगा सर्वांना आवडतो.  

इथे चांगला हे अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण होय. पण कधी-कधी विशेषण विशेष्याच्या नंतर येऊन वाक्यात विशेष्याबद्दलचे विधान पूर्ण करते.      

उदा.:

तो मुलगा आहे चांगला.  

अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण असे म्हणतात.

क्रियाविशेषण                

अ) मुलगा चांगला खेळतो.  

आ) मुलगी चांगली खेळते.  

इ) ते चांगले खेळतात.      

वरील वाक्यातील चांगला, चांगली, चांगले हे शब्द विशेषण आहेत. परंतु ती विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी आहेत.  

क्रियाविशेषण हे विकारी असते. त्यामुळे ही क्रियाविशेषणे आहेत पण क्रियाविशेषण अव्यय नाहीत.

विशेषणाचे कार्य व उपयोग               

१. नामसदृश विशेषणे –              

श्रीमंत माणसांना गर्व असतो. ( विशेषण )

श्रीमंतांना गर्व असतो. ( नाम )             

२. दर्शक विशेषणे -                

ही मुलगी चलाख आहे.                     

३. संबंधी विशेषणे – 

जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.           

४. प्रश्नार्थक विशेषणे – 

कोण मनुष्य येवून गेला

त्याने काय पदार्थ आणले?    

५. सार्वनामिक विशेषणे-                  

आम्हां मुलांना कोण विचारतो ? 

TAG-विशेषण मराठी,विशेषण मराठी वाक्य,विशेषण मराठी उदाहरण,विशेषण मराठी उदाहरणे,विशेषण मराठी अर्थ,मराठी विशेषण शब्द list,विशेषण प्रकार मराठी,गुणवाचक विशेषण मराठी,क्रिया विशेषण मराठी,सार्वनामिक विशेषण मराठी

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम