जुनी निवृत्तीवेतन योजना विषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना जुनी निवृत्तीवेतन योजना, या योजनेमुळे
जुनी निवृत्तीवेतन योजना Update | Old Pension Schemer| Juni Pension Yojana
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 2022 मध्ये आज विचारलेल्या जुनी निवृत्तीवेतन योजना विषयी विचारलेल्या
प्रश्नाचे उत्तर देताना जुनी निवृत्तीवेतन योजना, या
योजनेमुळे राज्यावर येणारा बोजा, शाळांना देण्यात येणारे
अनुदान यासंदर्भात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत
माहिती दिली. शिकविण्याकरिता शिक्षण ही संकल्पना स्वीकारावी लागेल असे
उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
“जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा
पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत
प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
विनाअनुदान तथा अंशत: अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांच्या अनुदानासंदर्भात सदस्य संजय शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नावर झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते अजित पवार, दिलीप
वळसे पाटील डॉ. राजेंद्र शिंगणे, राम शिंदे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्रप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच यापूर्वी 20 टक्के वेतन अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला तेव्हा 350 शाळा होत्या, जेव्हा अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा 3 हजार 900 एवढी शाळांची संख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे शासनावरील आर्थिक बोजा वाढला आहे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS