६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण,6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण,6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण,6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी,६ डिसेंबर मह
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण | 6 December Mahaparinirvana Day speech
आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण….
मोजता येत नाही उंची
बाबासाहेबांच्या कार्याची
त्यांनी जगाला शिकवली
भाषा माणुसकीची
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय
गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.....
आज 6 डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन
म्हणून साजरा करीत आहोत महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्त्व व देय आहे बौद्ध
धर्मानुसार निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना जीवनातील वेदना तसेच जीवन
चक्रातून मुक्त होतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध
धर्माचा अभ्यास केला होता त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सन 1956 मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांच्या
महान विचार व कार्य यामुळे त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली
जाते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर
भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला
त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भिमाबाई हे होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार
व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते ते त्यांना शालेय जीवनात अस्पृश्य म्हणून अपमान
सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी खूप कष्टातून आपले उच्चशिक्षण
पूर्ण केले.
त्यांनी अस्पृश्य व दिन दलितांचा उद्धार केला
उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली स्वतःच्या बुद्धीचा वापर समाजासाठी
केला त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश
दिला गोरगरीब दीन दलितांच्या न्याय हक्कांसाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केली.
डॉक्टर बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटना लिहिण्यात
सिंहाचा वाटा आहे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.
डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य कोणालाही शब्दात
मांडता येणार नाही असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव युगप्रवर्तक डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956
रोजी काळाच्या पडद्याआड गेले सारा देश हळहळला दादरच्या चैत्यभूमीवर
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आज ही लाखो अनुयायी 6 डिसेंबरला
चैत्यभूमी भेट देतात व डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतात.
अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद……!!!
जय हिंद…..!!! जय
भारत….!!! जय भीम… !!!
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण,6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण,6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण,6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS