काळाचे प्रकार,काळाचे प्रकार किती व कोणते,काळाचे प्रकार मराठी,काळाचे प्रकार कोणते,काळाचे प्रकार किती,काळाचे प्रकार व उदाहरणे,काळाचे प्रकार व उपप्रकार,क
काळ आणि काळाचे प्रकार | मराठी व्याकरण
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच
ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात.
क्रियापदांच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते, याचा
जो बोध होतो, त्याला काळ म्हणतात.
मुख्य काळ तीन आहेत
१. वर्तमानकाळ
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेंव्हा समजते
तेंव्हा तो वर्तमानकाळ असतो.
जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून क्रिया आता म्हणजे
वर्तमानात घडते, असा बोध होतो, तेव्हा त्या
क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो.
उदाहरणार्थ
१) सागर अभ्यास करतो.
२) संदेश पाणी पितो.
२. भूतकाळ
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेंव्हा
समजते तेंव्हा तो भूतकाळ असतो.
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे, असा
बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो.
उदाहरणार्थ
१) सागरने अभ्यास केला.
२) संदेशने पाणी पिले.
३. भविष्यकाळ
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेंव्हा समजते
तेंव्हा तो भविष्यकाळ असतो.
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, असा
बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ
१) सागर अभ्यास करील.
२) संदेश पाणी पिईल.
काळांचे उपप्रकार
वर्तमान काळाचे पोटप्रकार :-
१) साधा वर्तमानकाळ :-
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा
वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करतो.
२) अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ :-
जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा
चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू
वर्तमानकाळ' म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करीत आहे.
३) पूर्ण वर्तमानकाळ :-
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण
झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागरने अभ्यास केला आहे.
४) रीती वर्तमानकाळ :-
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर
त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करीत असतो.
भूतकाळाचे पोटप्रकार :-
१) साधा भूतकाळ :-
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात
जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास 'साधा भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागरने अभ्यास केला.
२) अपूर्ण किंवा चालू भूतकाळ :-
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच
त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला 'अपूर्ण
भूतकाळ/चालू भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करीत होता.
३) पूर्ण भूतकाळ :-
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती
क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला 'पूर्ण भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागरने अभ्यास केला होता.
४) रीती भूतकाळ :-
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया
पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला 'रीती भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करत असे.
भविष्यकाळाचे पोटप्रकार :-
१) साधा भविष्यकाळ :-
जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी
'साधा भविष्यकाळ' असतो.
उदा.- सागर अभ्यास करील.
२) अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ :-
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा
पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला 'अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करत असेल.
३) पूर्ण भविष्यकाळ :-
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण
झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला 'पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागरने अभ्यास केला असेल.
४) रीती भविष्यकाळ :-
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर
त्याला 'रीती भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.- सागर अभ्यास करत जाईल.
काळाचे उपयोग
अ.वर्तमानकाळ
१. सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले विधान करताना
उदाहरणार्थ
अ. सूर्य पूर्वेस उगवतो.
आ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
२. भूतकाळातील घटना वर्तमानात सांगताना
उदाहरणार्थ- अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो.( म्हणाला )
३. लवकरच सुरु होणारी क्रिया दर्शवताना (संनिहित भविष्यकाळ
)
उदाहरणार्थ- तुम्ही पुढे चला, मी येतोच. ( मी
येईन )
४. अवतरण देताना.
उदाहरणार्थ- समर्थ रामदास म्हणतात, जगी
सर्व सुखी असा कोण आहे ?'
५. लगतचा भूतकाळ सांगताना ( संनिहित भूतकाळ )
उदाहरणार्थ- मी बसतो ( बसलो ), तोच
तुम्ही हजर !
६. एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थी. ( रीती वर्तमानकाळ )
उदाहरणार्थ- तो नेहमीच उशिरा येतो. ( येत असतो. )
आ.भूतकाळ
१. ताबडतोब घडणा-या क्रियेबाबत ( संनिहित भविष्यकाळ )
उदाहरणार्थ -तुम्ही पुढे व्हा,
मी आलोच (येईन)
२. एखादी क्रिया भविष्यकाळी खात्रीने होणार या अर्थी
उदाहरणार्थ- जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज.
३. संकेतार्थ असल्यास
उदाहरणार्थ- पाउस आला, तर ठीक.
४. वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे अशा
अर्थी
उदाहरणार्थ- तो पहा तुझा मित्र आला.
ई) भविष्यकाळ
१. संकेतार्थ असल्यास –
उदाहरणार्थ- तू मदत देशील, तर मी आभारी होईन.
२. अशक्यता दर्शवलाना
उदाहरणार्थ- सगळेच मूर्ख कसे असतील ?
३. संभव असताना –
उदाहरणार्थ- गुरुजी आत शाळेत असतील.
४. इच्छा व्यक्त करताना –
उदाहरणार्थ- मला दोन रुपये हवे होते.
काळ आणि काळाचे प्रकार नोट्स.pdf
शिष्यवृत्ती सराव परीक्षा देण्यासाठी येथे क्लिक करा.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
पुढील शैक्षणिक Update मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.
· Facebook - https://www.facebook.com/thakareblog
· Twitter – https://twitter.com/aapalathakare
· Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
· Telegram – https://telegram.me/aapalathakare
· Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
· Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS