महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर Maharashtra Vidhan Parishad Graduates, Teachers Constituency Election Prog
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक
मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर
Maharashtra Vidhan Parishad Graduates, Teachers Constituency Election Program Announced
भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण
पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक व
अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग
शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे.
आजपासून या निवडणुकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू
करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी या
निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. १३
जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार
दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार
दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून
गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.
सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS