National Technology Awards, 2023 | राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार-2023
National Technology Awards, 2023 | राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार-2023
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ; 11 मे 1998 रोजी भारतीय लष्कराच्या पोखरण रेंजवर
भारताने अणु चाचणी यशस्वीपणे पार पाडून अभिमानास्पद
कामगिरी केली होती. 1998 च्या या अविस्मरणीय घटनेनंतर आपले
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला देशाला संपूर्ण अण्वस्त्रक्षम म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून, शास्त्रज्ञ,
संशोधक, अभियंते आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान
क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या कामगिरीचे स्मरण
करण्याच्या उद्देशाने, 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
म्हणून साजरा केला जात आहे.
हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी, भारत
सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेले तंत्रज्ञान विकास मंडळ ,राष्ट्रीय विकासात
महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या तंत्रज्ञान विषयक अभिनव संशोधनांना 1999 पासून राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार' देऊन गौरवते.
2023 वर्षासाठी ,राष्ट्रीय
तंत्रज्ञान पुरस्कारांसाठी तंत्रज्ञान विकास मंडळाने
भारतीय कंपन्यांकडून मुख्य,सूक्ष्म,
लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ),
स्टार्टअप, ट्रान्सलेशनल रिसर्च आणि
टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर या पाच श्रेणींमध्ये अर्ज मागवले
आहेत. अभिनव स्वदेशी तंत्रज्ञानाच्या यशस्वी
व्यवसायिकरणासाठी विविध उद्योगांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. हा वार्षिक
सन्मान भारतीय उद्योगांना आणि त्यांच्या तंत्रज्ञान प्रदात्यांना मान्यता मिळवून
देण्याचे एक व्यासपीठ प्रदान करतो , जे बाजारात नाविन्यपूर्ण संशोधन आणण्यात आणि
"आत्मनिर्भर भारत" स्वप्न साकारण्यात मदत
करतात.
- 11 मे 2023 रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील.
- अर्ज करण्यासाठी- https://awards.gov.in/ इथे भेट द्या
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जानेवारी 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
1. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (मुख्य): रु. 25
लाख
2. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (MSME): रु. 15 लाख
3. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (स्टार्ट-अप): रु. 15
लाख
4. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (अनुवादात्मक संशोधन):
रु. 5 लाख
5. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (तंत्रज्ञान व्यवसाय
इनक्यूबेटर): रु. 5 लाख
पुरस्कार विजेत्यांची संख्या
1. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (मुख्य):
पुरस्कारांची संख्या: एक 2. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (MSME): पुरस्कारांची संख्या: तीन 3. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (स्टार्ट-अप):
पुरस्कारांची संख्या: पाच 4. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (अनुवादात्मक
संशोधन): पुरस्कारांची संख्या: दोन 5. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार (तंत्रज्ञान व्यवसाय
इनक्यूबेटर): पुरस्कारांची संख्या: एक |
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url