⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनासाठी उद्बोधन सत्र

इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनासाठी उद्बोधन सत्र
Competent India for Class II to V: Orientation Session for Conducting Study Study Survey

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, त्यानुसार राज्यामध्ये सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीच्या पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता तिसरीच्या पुढे गेलेल्या/अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सन २०१७ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी अध्ययन निष्पत्ती प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच या अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा सुरवातीला देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादणूकीचे मूल्यमापन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे करणे अपेक्षित आहे. सन २०१७ व २०२१ चे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) अध्ययन निष्पत्तीच्या आधारेच घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर केंद्रशासनाच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचे पायाभूत अध्ययन अभ्यास (FLS) सर्वेक्षण-२०२२ हे सर्वेक्षण संबधित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेऊन करण्यात आले. यापुढील काळात होणारी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) अध्ययन निष्पत्तीवरच आधारित असणार आहेत.

इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर सर्वेक्षणाचा हेतू, सदर सर्वेक्षण शिक्षकांनी कसे करावे, सर्वेक्षण साधन (Tool) रचना व वापर, मूल्यांकन रुब्रिक रचना, श्रेणींची नोंद, विद्यार्थी कृतीकार्यक्रम यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शिक्षकांसाठी दि. २० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे.

निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२-२३ सर्वसाधारण शिक्षक मार्गदर्शकसूचना

या सत्रासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक ऑनलाईन उपस्थित राहावे.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम