Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजन

SHARE:

pariksha pe charcha 2023,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 2023 registration date,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 20

pariksha pe charcha 2023,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 2023 registration date,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 2023 registration date,परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजन

परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजन

परीक्षा पे चर्चा - ६या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसमवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी २०२३ मध्ये संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०५० विजेत्यांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांनी लिहिलेले परीक्षा योद्धाहे पुस्तक देण्यात येणार आहे. व परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक यांची सहभागी म्हणून नोंदणी करणेसाठी दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत http://innovateindia.mygov.in/ppc-2023/ विविध विषयांवर ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थी मा. पंतप्रधान महोदय यांचे समवेत होणा-या परीक्षा पे चर्चा - ६ कार्यक्रमासाठी आपले प्रश्न तयार करतील व त्यातील NCERT मार्फत निवड केलेले काही प्रश्न सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष घेतले जाऊ शकतात. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मागील आवृत्यांमध्ये सदर कार्यक्रमात प्रश्न विचारलेल्या सहभागींना मिडिया चॅनलद्वारे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. त्याच धर्तीवर यावर्षी निवडलेल्या काही सहभागींना माध्यमांशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सूचना आपल्याला कळविण्यात येतील.

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळा, अनुदानित शाळा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा, व राज्यातील इतर बोर्डाशी सलग्न असलेल्या शाळांचे विद्यार्थी (CBSE, ICSE, केंब्रिज, ICSE) यांचा जास्तीत जास्त सहभाग ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धेत नोंदविणे करिता आपल्या स्तरावरून प्रचार व प्रसार करणेबाबत कार्यवाही करणेत यावी. दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत सदर कार्यक्रमात ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची व निवड होण्याची संधी http://innovateindia.mygov.in/ppc-2023/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

शाळांनी सुद्धा या कार्यक्रमासंदर्भातील स्वतःचे पोस्टर्स, नाविन्यपूर्ण व्हिडीओ समाज संपर्क माध्यमावर #PPC2023 हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावेत. यामधून काही निवडक नाविन्यपूर्ण व्हिडीओ Mygov प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातील.

परीक्षा पे चर्चा ६ या कार्यक्रमात सहभागी होणेसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसाठी पुढील विषय

अ) विद्यार्थ्यासाठी विषय :

१) Know your freedom fighters (हमारी आजादी के नायक ) : (आमचे स्वातंत्र्यसैनिक)

तुमच्या राज्यातील किंवा प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल तुम्ही कोणत्या जीवनकथा ऐकल्या आहेत. त्यांच्या जीवनकथेतून तुम्हाला काय प्रेरणा मिळते ? तुम्हाला देशसेवा कशी करावयाची आहे याबद्दल आपले मत लिहा.

२) Our culture is our pride (हमारी संस्कृती हमारा गर्व) : (आमची संस्कृती आमचा अभिमान)

तुमच्या राज्याच्या संस्कृतीचे वैशिष्टे काय आहे ? संस्कृतीतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला तुमच्या देशाचा अभिमान वाटतो ?

३) My book my inspiration (मेरी प्रिय किताब ): (माझे प्रेरणादायी पुस्तक)

तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यामध्ये कोणत्या पुस्तकाचे योगदान आहे व कसे ?

४) Save Environment for future generations : (आने वाली पिढीयों के लिये पर्यावरण सुरक्षा) (पुढील पिढीसाठी पर्यावरण संरक्षण ):

शाश्वत विकासाबद्दल तुमच्या काय कल्पना (विचार) आहेत हवामानातील बदलामुळे आपल्या भावी पिढीसाठी कोणती आव्हाने आहेत ? आपल्या पर्यावरणाचे रक्षण (संवर्धन ) करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत? विद्यार्थी म्हणून शाश्वत विकासासाठी तुम्ही कसे योगदान देऊ शकता? ५) My life, my health ( अच्छा स्वस्थ क्यो जरुरी है ?) : (माझे जीवन माझे आरोग्य)

निरोगी राहणे का जरुरीचे आहे ? निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता ?

६) My startup dream (मेरा स्टार्टअप का सपना): (माझे नाविन्यपूर्ण व्यावसायिक बनण्याचे स्वप्न )

विद्यार्थ्यांमध्ये जीवनात यशस्वी व स्वावलंबी होण्यासाठी उद्योजकता निर्माण करणे आणि त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि कार्यसंस्कृतीत योगदान देणे ही काळाची गरज आहे. तुमच्या स्टार्टअपबद्दल तुमची स्वप्ने काय आहेत ?

७) STEM education / education without boundaries :- (सीमाओं के बिना शिक्षा ) (चौकटीबाहेरचे शिक्षण)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार विद्यार्थ्यांना विषया निवडीबाबत लवचिकता देणेबाबत शिफारस केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय घेण्याचे, स्वतःचा मार्ग निवडण्याचे आणि स्वतःच्या आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असेल. विज्ञान आणि गणिताच्या पलीकडेहि जीवन आहे याबद्दल तुम्ही काय विचार करता ? या बदलासंदर्भातील शिफारशीमध्ये तुम्हाला कोणती आव्हाने दिसतात? याबाबत तुमच्या सूचना काय आहेत ?

८) Toys and games for Learning in Schools : ( विद्यालय में सिखने के लिये खिलौने और खेल) (शाळेत शिकण्यासाठी खेळनि आणि खेळ )

खेळणी आणि खेळ हे सुद्धा शिकण्याचे स्त्रोत असू शकतात. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी खेळणी आणि खेळांद्वारे शिकण्यासंदर्भात तुमचे मत लिहा.

 

ब) शिक्षकांसाठी विषय :

१) Our Heritage: (हमारी धरोहर) - (आमचा वारसा)

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय पारंपरिक ज्ञान शिकवण्याचे महत्व काय आहे ? यासाठी तुम्ही शालेय परिसरामध्ये शैक्षणिक उपक्रमांचे एकत्रीकरण कसे कराल?

२) Enabling Learning Environment :( सीखने के लिये समर्थ वातावरण) -(अध्ययनपूरक वातावरण)

समृद्ध शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी निरोगी आणि अनुकूल

वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असावी ? सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही क्रियाकलपांची रचना कशी कराल ? “सध्यायी अध्ययनाबद्दल तुमचे विचार आणि मत काय आहे ?

३) Education for Skilling : (कौशल्य के लिये शिक्षण ) - ( कौशल्याधारित शिक्षण )

कौशल्यआधारित शिक्षण खूप महत्वाचे आहे. आपल्या देशात कौशल्य शिक्षण देण्यासाठी संपूर्ण शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक असले तरी माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हि काळाची गरज आहे. कारण अनेक विद्यार्थी शैक्षणिक / उच्च शिक्षण घेण्यास प्राधान्य देत नाहीत.उलट त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी विविध मार्ग शोधायचे असतात. यावर तुमचे काय मत (विचार) आहेत ?

४) Lesser Curricular Load and No fear for exam : (पाठ्यक्रम का कम भार और परीक्षा का कोई भय नाही ) - ( अभ्यासक्रमाचे कमी ओझे व भयमुक्त परीक्षा)

विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण आणि प्रकल्प आधारित अभ्यासक्रमाद्वारे शिकावे. ते काय शिकतात आणि कसे शिकतात यावर विश्वास असावा, यामुळे परीक्षेचा ताणताणाव आपोआप कमी होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मधील हा दृष्टीकोन अंमलात आणण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कसा पुढाकार घ्याल.

५) Future Educational challenges : ( भविष्य में शिक्षा कि चुनौतीयाँ) - ( शिक्षणातील भविष्यकालीन आव्हाने)

तुमच्या मते सध्याची शैक्षणिक आव्हाने काय आहेत ? शैक्षणिक प्रवाहातील बदलाना तोंड देण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घ्यावी.

क) पालकांसाठी विषय :

१) My child, my teacher : (मेरा बच्चा, मेरा अध्यापक ) - (माझे मुल, माझे शिक्षक )

तुमच्या मुलाने तुम्हाला काय आवडीने शिकविले आहे ? तुम्ही ते कसे शिकलात आणि त्याच्याशी

कसे जुळवून घेतले? आपल्या मुलांच्या आवडींशी जुळवून घेणे का महत्वाचे का आहे?

२) Adult Education - making everyone literate :- (प्रौढ शिक्षा सभी को साक्षर बनायें) - (प्रौढ शिक्षण - सर्वाना साक्षर बनविते)

तुमच्या मते प्रौढ शिक्षणाचे महत्व काय आहे? त्यातून समृद्ध राष्ट्र कसे निर्माण होऊ शकते ? प्रौढांना आधुनिक समस्या समजून घेण्यात मुले कशी योगदान देऊ शकतात?

३) Learning and growing together : (सिखना और एक साथ बढना) - (सर्व शिका आणि पुढे जा )

तुम्ही तुमच्या घरी मुलाला शाळेत शिकण्यासाठी कसे प्रोत्साहित कराल? तुमच्या मुलाच्या समृद्ध शिक्षण प्रक्रियेत पालक म्हणून तुमची भूमिका काय असेल यावर एक सृजनात्मक टीप लिहा.

सर्व खाजगी अनुदानित शाळा, अनुदानित शाळा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा, व राज्यातील इतर बोर्डाशी सलग्न असलेल्या शाळांचे विद्यार्थी (CBSE, ICSE, केंब्रिज, इ.) शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविणे. 

TAG- pariksha pe charcha 2023,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 2023 registration date,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 2023 registration date

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,370,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,635,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,531,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,785,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजन
परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजन
pariksha pe charcha 2023,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 2023 registration date,pariksha pe charcha 2023 date,pariksha pe charcha 20
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-huDIE7eXVodSHC2OruOBV1MHLHB3elVS4NJErAMYiQCHIxSmMywB2A9ZMBuc9IGhVx9JDxtS_5efvqTCXSSAe0vVvUFDNRVcbLM78nQu1IC-8MtgE97UWTnfc0nrlkkTJG7IxQJq1b0s14JmlSHTEVdX4MEZC5FCqR3ADVtsptWHZz6WbPoIM-aS/s16000/Pariksha%20Pe%20Charcha%20Contest%202023.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-huDIE7eXVodSHC2OruOBV1MHLHB3elVS4NJErAMYiQCHIxSmMywB2A9ZMBuc9IGhVx9JDxtS_5efvqTCXSSAe0vVvUFDNRVcbLM78nQu1IC-8MtgE97UWTnfc0nrlkkTJG7IxQJq1b0s14JmlSHTEVdX4MEZC5FCqR3ADVtsptWHZz6WbPoIM-aS/s72-c/Pariksha%20Pe%20Charcha%20Contest%202023.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2022/12/Pariksha-Pe-Charcha.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2022/12/Pariksha-Pe-Charcha.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS