अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागू Service benefits applicable to teaching / non-teaching staff in n
अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागू
Service benefits applicable to teaching / non-teaching
staff in non-government aided arts institutions
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश विचारात घेता उपरोक्त शासन निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक ५ ऑक्टोबर, २०१७ पासून लागू
अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८
मधील सर्वसाधारण तरतुदी (भविष्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांसह) लागू करण्याचा
शासन निर्णय क्रमांक ओडीआर-२७११/प्र.क्र.५०/तांशि-६ दिनांक ३.१०.२०१८ रोजी
निर्गमित करण्यात आला आहे.
तसेच, १) वर्ग-३ व वर्ग-४ च्या
कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करणे,
२)अध्यापकीय पदांना द्विस्तरीय/त्रीस्तरीय वेतनश्रेणी लागू
करणे,
३) मान्यताप्राप्त विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली
सेवा वरीष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरणे,
४) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण लागू करणे,
५) महिला शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रसुती
रजेसंदर्भातील तरतुदी लागू करणे,
६) कॅन्सर/ पक्षाघात झालेल्या शिक्षक / शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना म.ना.से. (रजा) नियम, १९८१ नियम ७९ परिशिष्ट
तीन मधील तरतुदी लागू करणे
७) शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च
प्रतिपूर्तीचा लाभ देणे आणि
८) शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत लाभ देणे या बाबतचे शासन निर्णय क्रमांक एडीआर-२०१८/प्र.क्र.११०/ १८(भाग२) /ताशि-६ दिनांक १९.४.२०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.
उपरोक्त शासन निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ, अनुदानित
कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक ५ ऑक्टोबर,२०१७ पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे.
राज्यातील अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवेत असताना अकाली मृत्यू पावले वा कोणत्याही दुर्धर रोगाच्या कारणाने त्याला सेवानिवृत्ती पत्करावी लागली तर त्यांचे लगतचे नातेवाईक पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यास पात्र असतील:
१. अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत अशासकीय अनुदानित
कला संस्थांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदरहू योजना दिनांक ५
ऑक्टोबर,
२०१७ पासून लागू असेल.
२. मृत वा वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झालेल्या
कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियम सोबत जोडलेल्या
परिशिष्ट “अ” मध्ये देण्यात आलेले आहेत.
३. संबंधित कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी नोकरीसाठी
करावयाचा अर्ज व त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रे याची माहिती परिशिष्ट “ब”
मध्ये नमूद केल्यानुसार असेल.
४.कर्मचारी मयत वा अकाली सेवानिवृत्त झाल्यावर तीन
महिन्यांच्या आत किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाचे कागदपत्र सादर करताना संबंधित
अधिकाऱ्याने आवश्यक माहिती (परिशिष्ट “क”) नातेवाईकांना
उपलब्ध करुन द्यावी व विहित प्रपत्रातील उमेदवाराचा अर्ज पंधरा दिवसांच्या आत
निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांच्याकडे सादर करावा.
५. अशासकीय अनुदानित कला संस्थांच्या बाबतीत सर्व विभागीय
सहायक निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट “ड” मधील माहिती निरीक्षक, चित्रकला
व शिल्प यांच्यामार्फत संचालक, कला संचालनालय यांना पाठवावी.
६. अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक/शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना दिनांक ५ ऑक्टोबर, २०१७ पासून अनुकंपा धोरण लागू करण्यात
आले असल्याने दिनांक ५ ऑक्टोबर, २०१७ ते सदर शासन
निर्णयाच्या दिनांकापर्यंत दिवंगत / अकाली सेवानिवृत्त झालेले अथवा सेवेसाठी
असक्षम/अपात्र ठरविण्यात आलेले शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना
परिशिष्ठ “अ” येथील नियमावलीमधील ५ अ व
५ ब ही अट लागू असणार नाही. तथापि, अशा नातेवाईकांनी सदर
शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३ महिन्याच्या आत अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी
अर्ज करणे बंधनकारक असेल.
७. अनुदानित कला संस्थांमधील रू ३८,६००-१,२२,८००/- (एस-१४) (पाचव्या वेतन आयोगानुसार रू ५५००–९०००) या वेतनश्रेणीपर्यतच्या सर्व पदांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती
देता येईल. तसेच, जी पदे भरण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे,
अशाच पदावरील नियुक्ती देण्यासाठी हे आदेश लागू राहतील.
८. शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर, २००२
अन्वये लागू करण्यात आलेले धोरण / नियमावलीमध्ये भविष्यात काही बदल झाल्यास,
सदर बदल अशासकीय अनुदानित कला संस्थांतील शिक्षक /शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांना सुध्दा लागू होतील.
संदर्भ - शासन निर्णय संकेताक २०२२१२१३१४५५०१०९०८
“अनुकंपा कारणास्तव अशासकीय अनुदानित कला
संस्थांमध्ये नोकरी देण्यासाठी नियमावली”
परिशिष्ट – “अ”
१. राहतील. राज्यातील अशासकीय अनुदानित कला संस्थांमध्ये
अनुकंपा तत्वावर करावयाच्या नेमणूकांना हे नियम लागू
२. खालील प्रकारामध्ये मोडणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या नियमानुसार अनुकंपा कारणास्तव अशासकीय अनुदानित कला
संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांवरील सेवेसाठी नेमणूकीस पात्र असतील.
अ) अशासकीय अनुदानित कला संस्थांच्या सेवेत असताना दिवंगत
झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. ब) क्षय, कर्करोग यासारख्या असाध्य
गंभीर आजारामुळे वा अपघातामुळे ज्या वर्ग १ ते ३ मधील कर्मचाऱ्यांच्या वयास किमान
५५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ५७ वर्षे
पूर्ण होण्यापूर्वी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार वैद्यकीय
कारणास्तव अकाली सेवानिवृत्ती घ्यावी लागलेले कर्मचारी. क) मानसिक किंवा शारिरिक
विकलांगता आल्याने सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने पुढील सेवेसाठी असक्षम/अपात्र
ठरविल्याने, अकाली निवृत्त करण्यात आलेले किंवा वरील
कारणास्तव सेवेतून काढून टाकण्यात आलेले कर्मचारी.
अ) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुढे नमूद केलेले
नातेवाईक या योजनेअंतर्गत पात्र असतील.
· दिवंगत/अकाली निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पत्नी / पती/मुलगा किंवा अवलंबून असलेली अविवाहित मुलगी अथवा मृत्यूपूर्वी / अकाली सेवानिवृत्तीपूर्वी कायदेशीरित्या दत्तक घेतलेला / घेतलेली, मुलगा/अविवाहित मुलगी व शासन वेळोवेळी विहीत करेल असा लगतचा नातेवाईक
·
(२)शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुलगा
हयात नसेल तसेच त्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाव्यतिरिक्त अन्य कोणीही
अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून या योजनेंतर्गत पात्र
समजण्यात यावी.
· (३)केवळ अविवाहित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा अविवाहित बहीण या योजनेसाठी पात्र समजण्यात येईल. याशिवाय अन्य कुठल्याही नातेवाईकास या योजनेचा फायदा मिळणार नाही.
(ब) सदर नेमणूक कर्मचाऱ्याच्या फक्त एकाच नातेवाईकास देता
येईल.
(क) उपरोक्त योजनेंतर्गत नियुक्ती देण्यापूर्वी
संबंधितांकडून कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र
घेण्यात यावे.
(ड) ज्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कायद्यानुसार एकापेक्षा
जास्त लग्न करण्यास प्रतिबंध करण्यात आला नसेल. अशा कर्मचाऱ्यांच्या एकापेक्षा
जास्त पत्नी हयात असल्यास ज्या पत्नीला किंवा तिच्या मुलाला / अविवाहित मुलीला
अनुकंपा तत्वावर नियुक्ती घ्यावयाची आहे, त्या व्यतिरिक्त अन्य
पत्नीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
अ) या नियमानुसार नियुक्ती मिळण्यासाठी सरळ अर्जाद्वारे
नियुक्ती करता येईल.
ब) संबंधित पदासाठी विहित शैक्षणिक अर्हता व निम्न
वयोमर्यादा याबाबतच्या अटी कटाक्षाने पाळण्यात येतील. मात्र उच्च वयोमर्यादेची अट
राहणार नाही.
क) तथापि, दिवंगत / अकाली निवृत्त कर्मचाऱ्याचा
पात्र नातेवाईक शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त इतर अटी पूर्ण करीत असल्यास, त्याच्या बाबतीत “वर्ग ४ च्या”पदावर
नेमणूकीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करता येईल व ही अट शिथिल करण्याचे अधिकार
शासनास राहतील.
ड) वर्ग –३ मधील शिक्षक व शिक्षकेतर पदावर
अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी / नियुक्तीच्या वेळी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्याला
पदाच्या उपलब्धतेअभावी वर्ग-४ मधील शिक्षकेतर पदावर नियुक्ती दिल्यास पद उपलब्ध
होताच वर्ग-३ मधील शिक्षक व शिक्षकेतर पदावर त्याला प्राधान्याने नियुक्ती देण्यात
यावी. अशी नियुक्ती सरळसेवा नियुक्तीने भरण्यात येणाऱ्या पदावरील समजण्यात यावी.
मात्र वर्ग-३ मधील शिक्षकेतर पदावर अनुकंपा योजनेन्वये नियुक्ती देण्याच्या आदेशात
तसा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसा उल्लेख करण्यात आला असेल तरच वर्ग-३ मधील
शिक्षक व शिक्षकेतर पदावर नियुक्ती देता येईल. परंतु त्यासाठी वरील अनुक्रमांक –४ (ब) मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हतेची अट पूर्ण होणे आवश्यक राहील.
अ)अनुकंपा कारणास्तव शिक्षक व शिक्षकेतर पदावर नेमणूकीसाठीचा अर्ज दिवंगत/अकाली
निवृत्त झालेल्या दिवसांपासून ३ महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे.
ब) सेवेत असतांना दिवंगत झालेल्या किंवा दुर्धर व्याधीमुळे
अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अज्ञान वारसदारांच्या
बाबतीत तो सज्ञान म्हणजे १८ वर्षाचा झाल्यावर ६ महिन्याच्या आत या योजनेखाली
नोकरीसाठी अर्ज करु शकेल.
अ) निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांच्या
कार्यालयात अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी येणाऱ्या सर्व अर्जांची ज्येष्ठतेच्या
दिनांकानुसार यादी ठेवावी. असे करताना “गट-क” मधील व “गट-ड” मधील पदांसाठी
स्वतंत्र यादी ठेवावी.
ब) निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांनी
प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करुन जेष्ठतेनुसार नियुक्तीस पात्र अर्जदारास,
त्यांच्या अर्हतेनुसार संबंधित अशासकीय अनुदानित कला संस्थेमध्ये पद
उपलब्ध असल्यास त्याच अशासकीय अनुदानित कला संस्थेत वा एकाच संचालक संस्थेच्या इतर
अशासकीय अनुदानित कला संस्थेमध्ये नियुक्तीसाठी विचार करावा. असे पद उपलब्ध
नसल्यास त्याच जिल्ह्यातील इतर अशासकीय अनुदानित कला संस्थेमध्ये सेवाप्रवेश
नियमानुसार व इतर तरतूदीनुसार नियुक्तीसाठी विचार करण्यात यावा. निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांच्याकडून अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उपलब्ध
असलेल्या पदावर उमेदवारांचे वाटप केल्यानंतर सात दिवसांचे आत नियुक्ती करण्याची
जबाबदारी संबंधित अशासकीय अनुदानित कला संस्थेची राहील. तसे केल्याचे संस्थेने
निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांना विनाविलंब कळविणे आवश्यक
राहील.
क) सर्व अशासकीय अनुदानित कला संस्थांमधून अनुकंपा तत्वावर
नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची संख्या, प्रतिक्षा
यादीवर असलेल्या उमेदवारांची संख्या, प्रत्यक्षात नियुक्ती
दिलेल्या उमेदवारांची संख्या याबाबतची ३१ डिसेंबर अखेरची माहिती निरीक्षक, चित्रकला व शिल्प यांचेकडे संस्थांनी दरवर्षी १५ जानेवारी पर्यंत पाठवावी.
ड) जे अशासकीय अनुदानित कला संस्थांचे प्रमुख त्यांच्या
संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या पदांची माहिती देणार नाहीत, अशा
अशासकीय अनुदानित कला संस्थांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
७. अ)अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरिता मासिक उत्पन्नाची तसेच
ठोक रकमेची मर्यादा राहणार नाही.
ब) एखाद्या कुटुंबात मृत कर्मचाऱ्याचे नातेवाईक पूर्वीच
सेवेत असल्यास व तो नातेवाईक त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आधार देत
नसल्यास अशा प्रकरणात त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे किंवा कसे हे
नियुक्ती प्राधिकाऱ्याने अत्याधिक दक्षता घेवून ठरवावे व त्यांची खात्री
पटल्यानंतरच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या योजनेचा लाभ देण्यात यावा.
या संदर्भात नियुक्ती अधिकाऱ्याने सदर कुटुंबास मिळणाऱ्या
निवृत्ती वेतनाची रक्कम, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, त्याची मालमत्ता, दायित्व, गंभीर
आजारामुळे किंवा अपघातामुळे मृत झाला असल्यास त्यासाठी करण्यात आलेला वैद्यकीय
खर्च, कुटुंबातील मिळवत्या व्यक्ती इ. बाबी विचारात घेणे
अपेक्षित आहे.
८. अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या वेळी बींदू नामावली
विचारात घेणे आवश्यक नाही.
९. जे उमेदवार प्रतिक्षा यादीवर आहेत, परंतु
विहित वयोमर्यादेमध्ये त्यांच्या अर्हतेनुसार पद रिक्त झाले नाही तर अशी
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची नावे प्रतिक्षा यादीवर राहतील व त्यांच्यासाठी
उच्च वयोमर्यादेची अट राहणार नाही.
१०. अनुकंपा तत्वावरील उमेदवारांने सेवेत शिपाई म्हणून वा
वर्ग-४ च्या पदावर नियुक्ती स्विकारल्यानंतर सेवेत असतांना उच्च अर्हता प्राप्त
केली तर तो प्रचलित नियमानुसार पुढील पदासाठी पात्र ठरु शकेल.
११. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्यावेळी उमेदवाराच्या
अर्हतेनुसार पद उपलब्ध नसेल व उमेदवार विहित काळात अशी अर्हता प्राप्त करु शकेल
अशी नियुक्ती प्राधिकाऱ्यांची खात्री असेल तर नियुक्ती प्राधिकारी तसे अभिप्राय
नोंदवून त्यास त्या पदावर नियुक्ती देवू शकेल. मात्र विहित काळात उमेदवाराने विहित
अर्हता प्राप्त केली नाही तर त्याची सेवासमाप्त करण्याचा अधिकार नियुक्ती
प्राधिकाऱ्यास असेल.
१२.नियुक्ती संदर्भात अडचण निर्माण झाल्यास नियुक्ती
प्रधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुध्द वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमानुसार दाद मागता येईल.
१३.अनुकंपा तत्वावरील नियुक्ती करतांना जिल्हा हे युनिट (एकक) गृहित धरण्यात यावे. सदर तरतूद मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू राहणार नाही.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS