शिक्षक बदली पोर्टल,शिक्षक बदली पोर्टल लिंक,शिक्षक बदली 2022,शिक्षक बदली 2022 gr,शिक्षक बदली 2022 update,शिक्षक बदली संवर्ग 1,शिक्षक बदली अपडेट,शिक्षक
संवर्ग 3 पसंतीक्रम कसा भरावा.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना दि. 10 ते 14 जानेवारी दरम्यान बदली फॉर्म भरता येतील.
• दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.
➡️ मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.
➡️ 16 ते 19 जाने. दरम्यान प्रक्रिया राबवून 19 जानेवारी ला बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर होतील.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या बदलीसाठी धरावयाच्या सेवाजेष्ठतेने करण्यात येतील GR परिच्छेद 4.4.3 नुसार
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदली प्रक्रियेमध्ये आपला बदली करिता पसंतीक्रम भरला नाही तर त्यांची बदली होणार नाही.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करिता अर्ज भरण्याची संधी मिळू शकते.
(संदर्भ 7 जून 2022 वेंसिसने विचारलेल्या प्रश्नाला शासनाने दिलेले उत्तर )
➡️ सद्य परिस्थितीत बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्याच जागा दाखवल्या जातील.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये किंवा शासन आदेशामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र होतो असे कोठेही म्हटले नसल्यामुळे बदली अधिकार मात्र शिक्षक बदली पात्र होत नाही त्यामुळेच अशा शिक्षकांना त्यांनी पाच वर्षे सेवा शाळेवर व त्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण केले असतानाही त्यांना शाळा न मिळाल्यास असे शिक्षक विस्थापित होणार नाहीत.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पोर्टलवर बदली करिता पसंतीक्रम दिला आणि त्यांच्या सेवाजेष्ठतेने व त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली तरच बदली होईल त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळांना न मिळाल्यास त्यांची बदली होणार नाही ते आहे त्या शाळेवर राहतील
➡️ बदली अधिकार पात्र टप्प्यामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक हे एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाहीत
➡️ सन 2019 च्या अवघड क्षेत्रातील यादीतील शाळा 2021/2022 मध्ये सुगम झाली आणि 2022 बदलीमध्ये त्या शिक्षकाची बदली नाही झाली तर पुढील बदली प्रक्रियेमध्ये त्या शिक्षकास नवीन यादी ज्या दिवशी घोषित झाली तेथून 10 वर्ष बदली होणार नाही.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार सबमिट होणार नाही.
➡️ एखाद्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील एक पद समानीकरणांतर्गत ठेवलेले असेल व बदली मागून सुद्धा शिक्षकाची बदली झालेली नसेल तर अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही शिक्षकास इतरत्र पदस्थापित केले जाणार नाही.
अनेक जिल्ह्यांमध्ये बदली अधिकार मात्र शिक्षकांची संख्या एक हजारावरून जास्त आहे व अशा परिस्थितीत त्यांना बदली पात्र शिक्षकांच्या दाखवल्या जाणाऱ्या जागा नाममात्र असल्यामुळे अशा परिस्थितीत प्रशासनास बदली अधिकार प्रात्र शिक्षकांच्या बदल्या करणे शक्य नाही तरीसुद्धा बदली प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यामध्ये काही निर्णय घेऊन अवघड क्षेत्रातील रिक्त राहणाऱ्या जागांबरोबरच बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या जागाही या टप्प्यात रिक्त दाखविल्यास निश्चितच अवघड क्षेत्रातील रिक्त राहणाऱ्या जागांच्या बदली प्रक्रियेमध्ये बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात शेवटी प्रशासनाच्या मानसिकतेवर
➡️ बदली समिती अध्यक्षांच्या मते पुढील बदली प्रक्रिया 2023 - 24 दिनांक 1 मार्च 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आठ ते नऊ बदली आदेशात बदल करून राबविण्यात येईल.
✳️ पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता.
✳️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा.
➡️ वरील लिंक वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे
➡️ डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे
➡️ त्यातील application form वर क्लिक करावे
➡️ Entitle application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती स्क्रीनवर दिसेल त्यावर
शिक्षकाचे नाव
आडनाव
शाळेचा यु डायस नंबर
शिक्षकाचा शालार्थ आयडी
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.
➡️ वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही
➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल
पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर
➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल.
➡️ याचाच अर्थ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या शाळांपैकी 30 प्राधान्यक्रम अथवा 30 पेक्षा कमी प्राधान्यक्रम उपलब्ध असल्यास उपलब्ध असलेले प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे.
➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी.
➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील
किती मंजूर पदे
किती कार्यरत पदे
शाळेतील रिक्त पदे
समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे
बदली पात्र शिक्षकांची पदे
ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील
➡️ Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल.
➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.
➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी.
➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.
➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save करावी.
➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.
➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
➡️ संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल.
➡️ तसेच आपणास आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही बदल करायचं असल्यास आपण आपला फॉर्म मुदतीपूर्वी withdraw करू शकता व पुन्हा भरू शकता.
➡️ वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
संवर्ग-1 मध्ये बदलीची विनंती
करण्यासाठी फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षकांसाठी माहिती.
Information for all teachers who have filled the form to
request transfer to Cadre-1.
- 21/12/2022 ते 24/12/2022 संवर्ग-1 शिक्षक प्राधान्यक्रम भरू शकतात.
- संवर्ग-1 साठी पसंतीक्रम अनिवार्य नाही जर त्यांनी पसंतीक्रम भरला नाही तर त्यांची संवर्ग-1 मध्ये
- बदली होणार नाही, जर ते शिक्षक बदलीसाठी पात्र असतील आणि त्यांचे नाव बदलीपात्र यादीत असेल तर त्यांची बदलीपात्र फेरी दरम्यान बदली केली जाईल.
- संवर्ग-1 शिक्षकाला बदली करायची असेल तर त्याला किमान 1 प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम देऊ शकतात. जर त्याने कोणतेही प्राधान्यक्रम दिले नाही तर त्याला फॉर्म सबमिट करता येणार नाही.
- संवर्ग-1 मध्ये 30 पसंती क्रमाची कोणतीही सक्ती नाही.
- शिक्षक आपला प्राधान्यक्रम जतन (Save) करू शकतात परंतु सबमिट करण्यास विसरू नका अन्यथा तुमचा फॉर्म बदली प्रणालीद्वारे विचारात घेतला जाणार नाही.
- एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्ममध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही.
- संवर्ग-1 शिक्षक बदलीसाठी फक्त शाळा निवडू शकतात जिथे बदली पात्र शिक्षक उपलब्ध असतील. संवर्ग-1 शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहे ती शाळा पसंतिक्रमात निवडू शकत नाहीत.
- संवर्ग-1 शिक्षकाने जर फॉर्म, मला संवर्ग-1 अंतर्गत बदली नको असे निवडून सबमिट केला असेल, तर त्यांनी बदली प्रक्रियेतून सूट घेतल्या मुळे त्यांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली जाणार नाही.
- संवर्ग-1 साठी पसंतीक्रम भरण्यासाठी दिलेल्या तारखा संपल्यानंतर, शिक्षक, बदली व्यवस्थापन प्रणालीमध्ये कोणतेही प्राधान्यक्रम बदलू किंवा सबमिट करू शकणार नाहीत.
- संवर्ग-1 फॉर्म सबमिट करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यांच्या पसंती क्रमाची पडताळणी करावी आणि त्यांनी भरलेला प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करावी.
- जर संवर्ग-1 शिक्षकाने प्रदान केलेल्या प्राधान्य क्रमानुसार बदली मिळाली नाही तर त्याची या संवर्ग-1 फेरीत बदली होणार नाही, परंतु जर तो शिक्षक बदली पात्र शिक्षक असण्याची शक्यता आहे आणि बदली पात्र शिक्षकांच्या फेरीत बदली होणार. अश्या शिक्षकाने बदली पात्र फेरीत परत प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
- संवर्ग-1 शिक्षकांनी फॉर्म भरण्यापूर्वी खालील ट्यूटोरियल व्हिडिओ पहावे आणि काही शंका असल्यास कोणत्याही स्पष्टीकरणासाठी नोडल कार्यालयाशी संपर्क साधावा.
- शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी असेल आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी
- अडचण टाळण्यासाठी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत उशीर करू नये, आम्ही सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळेत भरावेत.
- पोर्टल वर वापरला जाणारा ओटीपी ईमेलवर आणि तसेच शिक्षकांच्या मोबाइलवर पाठवले जातात, जर तुमचा ओटीपी तुमच्या इनबॉक्समध्ये दिसत नसेल तर तुमचा जंक ईमेल तपासायला विसरू नका.
- तुमची बदली तुमच्या हातात आहे योग्य वेळ द्या आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या आणि त्यानंतरच तुमची प्राधान्येक्रम सबमिट करा घाईघाईने पुढे जाऊ नका आणि नंतर चुकांसाठी पश्चात्ताप करू नक.
सूचना- Vinsys Support Team
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS