एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश तसेच वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश प्रक्रिया सुलभ
एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश तसेच वयानुरूप वर्गामध्ये
प्रवेश प्रक्रिया सुलभ
Ease of admission process from one school to another as
well as admission to age class
राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या शाळेत ‘शाळा
स्थलांतर प्रमाणपत्रा’अभावी (Transfer Certificate) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे
आवाहन शिक्षण मंत्रांनी केले.अन्य शाळेतून आलेल्या १ली ते १०वी विद्यार्थ्यांच्या
सुलभ प्रवेशाबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला.
८ राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/
खाजगी अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर
चालविण्यात येणारी व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न
असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी
प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. आरटीई अधिनियमातील कलम-४ अन्वये शालेय
प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे
नमूद आहे आणि कलम १४ (१) नुसार प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा
अशी तरतुद आहे. त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येवून
विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.
राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणारी व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वी ते १० वी च्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देवून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. पूर्वीच्या शाळेकडून T.C. (Transfer Certificate) प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येवून इयत्ता १० वी पर्यंन्त वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात यावा. प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी / मुख्याध्यापकांनी घ्यावी. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरूद्ध / मुख्याध्यापका विरूद्ध नियमानुसार / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
वरीलप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश
घेतल्यास अशी नवीन शाळा सदर विद्यार्थ्याची सरल पोर्टल वरील माहिती मिळविण्याची
विनंती जुन्या शाळेकडे करेल, व जुनी शाळा ७ दिवसाच्या आत विनंती
मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती
त्यांच्या स्तरावरून मान्य करतील.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS