लिंग व त्याचे प्रकार
लिंग व त्याचे
प्रकार | मराठी व्याकरण
लिंग, वचन व विभक्ती यांमुळे
नामाच्या रुपात बदल होतो त्याला नामांचे विकरण असे म्हणतात.
नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची
आहे की स्त्रीजातीची की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते
त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात.
उदा.
१. तो पुरुष.
२. ती स्त्री.
३. ते मूल.
वरील प्रत्येक शब्दमागे आलेली तो, ती आणि ते ही सर्वनामे त्या त्या शब्दाची वेगवेगळी जात
किंवा लक्षण दाखवतात. ह्याच लक्षणांना लिंग असे
म्हणतात.
मराठीत तीन लिंगे मानतात.
१. पुल्लिंग
२. स्त्रीलिंग
३. नपुंसकलिंग
पुल्लिंग
प्राणीबाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करून देणा-या
शब्दाला पुरुषलिंगी, पुंलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात.
उदाहरणार्थ - चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा इत्यादी.
स्त्रीलिंग
स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणा-या शब्दांना
स्त्रीलिंगी असे म्हणतात.
उदाहरणार्थ - चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इत्यादी.
नपुंसकलिंग
निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री कोणत्याच
जातीचा बोध होत नसेल तर त्या शब्दांना नपुंसकलिंगी असे म्हणतात.
उदाहरणार्थ - घर, वरण, पेन, तेज इत्यादी
लिंग व त्याचे प्रकार Mock Test Link
मराठीतील लिंग ओळखण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
प्राणीमात्रांमधील पुरुष किंवा नर यांचा उल्लेख आपण तो या
शब्दाने करतो तर स्त्री किंवा मादी जातीचा उल्लेख ती या शब्दाने करतो.
उदाहरणार्थ - तो बाप, ती
आई, तो घोडा, ती घोडी, तो पोपट, ती मैना इत्यादी
सजीव प्राण्यातील एखादा नर आहे किंवा मादी हे निश्चित
सांगता येत तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतात.
उदाहरणार्थ - ते कुत्रे, ते
वासरू, ते पाखरू इत्यादी
निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही वेळेस काल्पनिक पुरुषत्व व
स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो ती ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो.
उदाहरणार्थ
१. तो वाडा
२. ती इमारत
३. ते घर
४. तो भात
५. ती भाकरी
६. ते वरण
७. तो टाक
८. ती लेखणी
९. ते पेन
१०. तो दिवा
११. ती पणती
१२. ते तेज
लिंगभेदामुळे नामांच्या रुपात होणारा बदल
नियम : १
'अ' कारान्त पुल्लिंगी
प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते.
उदा :
१. मुलगा - मुलगी - मूलगे
२. पोरगा - पोरगी - पोरगे
३. कुत्रा - कुत्री - कुत्रे
नियम : २
काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे
स्त्रीलिंगी रूप होतात.
उदा :
१. सुतार - सुतारीन
२. माळी - माळीन
३. तेली - तेलीन
४. वाघ - वाघीन
नियम : ३
काही प्राणीवाचक 'अ' कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे 'ई' कारान्त होतात.
उदा :
१. हंस - हंसी
२. वानर - वानरी
३. बेडूक - बेडकी
४. तरुण - तरुणी
नियम : ४
काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय
लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.
उदा :
१. लोटा - लोटी
२. खडा - खडी
३. सुरा - सुरी
४. गाडा - गाडी
५. दांडा - दांडी
६. आरसा – आरशी
नियम : ५
संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई
प्रत्यय लागून होतात.
उदा :
१. युवा - युवती
२. श्रीमान - श्रीमती
३. ग्रंथकर्ता -
ग्रंथकर्ती
नियम : ६
काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.
उदा :
१. बाप - आई
२. नवरा - बायको
३. वर - वधु
४. मुलगा - सून
५. राजा - राणी
६.दीर - जाऊ
७. पती - पत्नी
८. पुत्र - कन्या
९. भाऊ - बहीण
१०. सासू - सासरा
११. पिता - माता
१२. पुरुष - स्त्री
१३. बोकड - शेळी
१४. रेडा - म्हेस
१५. मोर - लांडोर
१६. बैल - गाय
१७. बोका - भाटी
१८. खोंड - कालवड
नियम : ७
मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा :
नियम : ८
परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या
लिंगावरून ठरवितात.
उदा :
१. बुट (जोडा) - पुल्लिंगी
२. क्लास (वर्ग) - पुल्लिंगी
३. पेन्सिल (लेखणी) - स्त्रीलिंग
४. बुक (पुस्तक) - नपुंसकलिंगी
५. कंपनी (मंडळी) - स्त्रीलिंगी
६. ट्रंक (पेटी) - स्त्रीलिंगी
नियम : ९
सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.
उदा :
१. साखरभात - पुल्लिंगी
२. मिठभाकरी - स्त्रीलिंगी
३. भाजीपाला - पुल्लिंगी
४. भाऊबहीण - स्त्रीलिंगी
५. देवघर - नपुसकलिंगी
नियम : १०
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख
पुल्लिंगीच करतात.
उदा .
१. गरुड
२. मासा
३. सुरवड
४. साप
५. होळ
६. उंदीर
नियम : ११
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख
केवळ स्त्रीलिंगी करतात.
उदा
१. घुस
२. पिसू
३. माशी
४. ऊ
५. सुसर
६. खार
७. घार
८. पाल
लिंग व त्याचे प्रकार (मराठी व्याकरण) नोट्स.pdf
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS