⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

वचन मराठी व्याकरण | मराठी व्याकरण वचन बदला | वचनाचे नियम

वचन मराठी व्याकरण,मराठी व्याकरण वचन बदला,मराठी व्याकरण वचन बदला,वचन बदला मराठी,	वचन बदला शब्द मराठी

वचन मराठी व्याकरण

नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.  

मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात. 

मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रुपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रुप बदलत नाही.

मराठीत दोन वचनें मानतात.

१. एकवचन  

२. अनेकवचन      

एकवचन -    

जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.  

उदा.- मासा, गाय, फूल, मुलगा इ.      

अनेकवचन -

जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. 

उदा.- मासे, गाई, फुले, मुलगे इ.  

वचनभेदामुळे नामांच्या रुपात होणारा बदल

आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते.

एकवचन

अनेकवचन

कुत्रा

कुत्रे

आंबा

आंबे

घोडा

घोडे

ससा

ससे

लांडगा

लांडगे

मुलगा

मुलगे

फळा

फळे

राजा

राजे

आकारांतशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.      

एकवचन

अनेकवचन

देव

देव

उंदीर

उंदीर

कवी

कवी

शत्रू

शत्रू

लाडू

लाडू

कागद

कागद

तेली

तेली

गहू

गहू

मध

मध

स्त्रीलिंगी नामांची अनेकवचने

आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कधी आकारांत होते तर कधी ईकारांत होते.

एकवचन

अनेकवचन

वेळ

वेळा

वीट

विटा

चूक

चुका

केळ

केळी

भिंत

भिंती

तारीख

तारखा

विहीर

विहिरी

म्हेस

म्हशी

सून

सुना

य नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो.

उदाहरणार्थ  

गाय - गायी - गाई

सोय - सोयी - सोई इत्यादी

आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.

एकवचन

अनेकवचन

भाषा

भाषा

दिशा

दिशा

पूजा

पूजा

आज्ञा

आज्ञा

सभा

सभा

विद्या

विद्या

ईकारांत नामाचे अनेकवचन याकारांत होते ( अपवाद - दासी, दृष्टी इत्यादी )    

एकवचन

अनेकवचन

नदी

नद्या

बी

बिया

स्त्री

स्त्रिया

काठी

काठ्या

भाकरी

भाक-या

लेखणी

लेखण्या

उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते ( अपवाद - वाळू, वस्तू, बाजू )   

एकवचन

अनेकवचन

सासू

सासवा

जाऊ

जावा

जळू

जळवा

ऊवा

पिसू

पिसवा

एकारांत आणि एकारांत स्त्रीलिंगी शब्दांची रूपे आ - या कारांत होतात.

उदाहरणार्थ - पै - पया     

प्रचारात असलेला ओकारांत स्त्रीलिंगी शब्द बायको असून त्याचे अनेकवचन बायका असे होते.  

नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने      

अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते.

एकवचन

अनेकवचन

घर

घरे

दार

दारे

फुल

फुले

शेत

शेते

माणूस

माणसे

घड्याळ

घड्याळे

ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते व विकल्पाने य हा आदेश होतो. (अपवाद - पाणी, लोणी, दही, अस्थी)

एकवचन

अनेकवचन

मोती

मोत्ये

मिरी

मिर्ये

उकारांत आणि ऊकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते क्वचित प्रसंगी ते वेकारांत होते.

एकवचन

अनेकवचन

पाखरू

पाखरे

वासरू

वासरे

लिंबू

लिंबे

पिलू

पिले

गळू

गळवे

आसू

आसवे

एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ईकारांत होते. (अपवाद - सोने, रूपे, तांबे, शिसे यांची अनेकवचने एकवचनाप्रमाणे राहतात.)          

एकवचन

अनेकवचन

केळी

केळी

गाणे

गाणी

मडके

मडकी

कुत्रे

कुत्री

खेडे

खेडी

रताळे

रताळी

आकारांत , एकारांत व ओकारांत नपुंसकलिंगी नामे मराठीत नाहीत.      

वचनासंबंधी विशेष गोष्टी

१. नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामांची अनेकवचने होतात. विशेषनामांची व भाववाचक नामांची अनेकवचने होत नाहीत.

२. कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखविण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेकवचनी प्रयोग करतो.

उदाहरणार्थ

१. गुरुजी आताच शाळेत आले.  

२. मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत.          

अशा वेळी त्यास आदरार्थी अनेकवचन किंवा आदरार्थी बहुवचन असे म्हणतात. असा आदर दाखविण्यासाठी राव, जी, पंत, साहेब, महाराज यासारखे शब्द जोडतात.       

उदाहरणार्थ  - गोविंदराव, विष्णुपंत, गोखलेसाहेब इत्यादी.    

स्त्रियांच्या नावासमोर बाई, ताई , माई, आई, काकू इत्यादी शब्द येतात.  

उदाहरणार्थ  - राधाबाई, शांताबाई, जानकीकाकू इत्यादी       

३. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

उदाहरणार्थ  - डोहाळे, कांजिण्या, शहारे , क्लेश, हाल, रोमांच इत्यादी. 

४. विपुलता दाखविण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात.

उदाहरणार्थ

१. यंदा-खुप आंबा पिकला

२. शेटजींच्या जवळ खूप पैसा आहे

३. पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते.      

५. जोडपे, त्रिकुट, आठवडा, पंचक, डझन, शत, सहस्त्र, लक्ष, कोटी या शब्दांमधून अनेकत्वाचा बोध होतो, तरीही तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जातात.  

अनेक गट मानले तर मात्र अनेकवचनी वापरतात. तसेच ढीग, रास, समिती, मंडळ, सैन्य वगेरे शब्दांतील समूह हा एकच मानला जात असल्यामुळे ती एकवचनी ठरतात. मात्र समूह अनेकवचनी मानले तर ते अनेकवचनी ठरतात 

६. अधिक सलगी किंवा जवळीक दाखवायची असेल तेव्हा मोठ्या व्यक्तींबाबतही एकवचन वापरण्यात येते.   

उदाहरणार्थ  

१. दादा शाळेतून आला.  

२. वाहिनी उद्या येणार आहे.  

३. बाबा गावाला गेला.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा देण्यासाठी येथे क्लिक करा.

वचन मराठी व्याकरण नोट्स PDF

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम