⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), २०२२ च्या अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), २०२२ च्या अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), २०२२ च्या अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

Final Result and Merit List of Scholarship Examination 2022 Announced

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या मंगळवार दि. ०३/०१/२०२३ रोजी रात्री ०९.०० वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

दि. ३१ जुलै, २०२२ रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक ०७/११/२०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

अंतिम निकाल प्राप्त करणे 

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वत: चा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.

NVS प्रवेश 2023-24: नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे

संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे

  • १. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)
  • २. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय
  • ३. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय / तालुकानिहाय )

अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) Link

गुणवत्ता यादी 2022 Download

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२३ | Scholarship Exam Mock Test 2023 

गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.

१. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी.

२. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी. ३. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.

४. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.

५. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.

गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत

परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी व अंतिम गुणपत्रक प्रत मंगळवार दि. ०३ जानेवारी, २०२३ रोजी उपलब्ध करून दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.

संचनिहाय कटऑफ 5वी (जिल्हानिहाय)

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), २०२२ च्या अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

संचनिहाय कटऑफ वी(जिल्हानिहाय )
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), २०२२ च्या अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम