⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Maha TAIT परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023

Maha TAIT 2025 परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

महाराष्ट्र राज्यात 2017 पासून पवित्रामार्फत शिक्षक पदांची भरती केली जाते. 2017 पासून शिक्षक भरती महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीद्वारे केली जाते. ऑक्टोबर 2023 मध्ये, महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद खंडपीठात आगामी महा TAIT 2023 ची माहिती दिली होती. अनेक उमेदवार या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. महा TAIT अभ्यासक्रम 2025 तुम्हाला अभ्यासासाठी योग्य दिशा देतो. आज या लेखात आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम (Maha TAIT Syllabus 2025) आणि Pattern (Maha TAIT Exam Pattern 2025) बद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022 Link

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्रशाळा आणि शासकीय व अनुदानित शिक्षक पदविका महाविद्यालय पदांच्या भरतीच्या वेळी, निवडीसाठी सर्व उमेदवारांना समान संधी देणे आणि उच्च दर्जाच्या उमेदवाराची शिक्षा सेवक पदासाठी निवड करणे, शिक्षा सेवकाची भरती अभियोग्यता आणि प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल. (maha tat 2025)”. तथापि, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे शिक्षकांची अंतिम निवड केली जाते.

MahaTAIT Exam Pattern 2025: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2025) चे MahaTAIT Exam Pattern 2025 खालीलप्रमाणे आहे. MahaTAIT 2025 ची परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. MahaTAIT 2025 साठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारास परीक्षेचे माध्यम निवडावे लागणार आहे. MahaTAIT परीक्षेसाठी उमेदवारांना English व मराठी किंवा English व उर्दू  यापैकी एक परीक्षेचे निवडावे लागेल.

 TAIT -2025 Whatsa app Group Link

MahaTAIT Exam Pattern 2023 As per GR

Subject

No of Question

Marks

Aptitude (अभियोग्यता)

120

120

Intelligence (बुध्दिमत्ता)

80

80

Total

200

200

 

शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. विषयानुसार प्रश्नांची वर्गवारी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

Sr. No

विषय

प्रश्न संख्या

गुण

माध्यम

वेळ

1

English Language (इंग्लिश भाषा)

15

15

English

120 Min (2 Hours)

2

Marathi Language (मराठी भाषा)

15

15

मराठी

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

30

30

मराठी / उर्दू /  English

4

बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy)

30

30

मराठी / उर्दू /  English

5

Quantitative Aptitude (अंकगणित)

30

30

मराठी / उर्दू /  English

6

Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी)

80

80

मराठी / उर्दू /  English

एकूण

200

200



  • 1.       परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारल्या जातील
  • 2.     परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • 3.     परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • 4.     परीक्षेत Negative Marking राहणार नाही

सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल.

Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम

Maha TAIT Syllabus 2025: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2025) परीक्षा कशी होईल यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्यात महाराष्ट्र शासनाने Maha TAIT Syllabus 2025 परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. शासन निर्यायाप्रमाणे Maha TAIT Syllabus 2025 खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

विषय

Maha TAIT Syllabus 2025

Aptitude (अभियोग्यता)

अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

Intelligence (बुध्दिमत्ता)

बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

 

Sr. No

विषय

घटक

1

English Language (इंग्लिश भाषा)

Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)

Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

Fill in the blanks in the sentence

Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2

Marathi Language (मराठी भाषा)

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)

म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह

प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

इयत्ता 08 ते 12 ची सर्व विषयाची क्रमिक पुस्तके

4

बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy)

मुलांच्या विकासाची तत्त्वे, बहु-आयामी बुद्धिमत्ता, पायगेट, कोहलबर्ग आणि वायगोत्स्की यांच्या उपपत्या,अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती

5

Quantitative Apitude (अंकगणित)

संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी

6

Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी)

आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी

07 फेब्रुवारी 2022 च्या Government Resolution (GR) नुसार महाराष्ट्र शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल त्यामुळे यात बदल होऊ शकतो. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम