राष्ट्रपिता महात्मा गांधी मराठी निबंध | Rajshtrapita Mahatma Gandhi Marathi Essay,राष्ट्रपिता महात्मा गांधी पर निबंध,राष्ट्रपिता महात्मा गांधी पर निबं
राष्ट्रपिता महात्मा गांधी मराठी निबंध | Rajshtrapita Mahatma Gandhi Marathi Essay
भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती. आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते.
सत्य, अहिंसा, न्याय, समानता,
सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि
जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ,
असत्य, संकुचितपणा, राजकारण,
जातिभेद, घृणा, द्वेष,
लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार
आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.
जे असाधारण, असंभव आणि अविश्सनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले.
त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार,
साधेपणा, खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा
देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म
गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई
होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक
स्त्री होती. वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह
कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला
स्थलांतर केले.
किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या
मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली
करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले.
तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना
रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या
डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात
आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा
निश्चय केला. 'गीता'
त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.
१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ
साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार
त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार,
मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह,
सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि
संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम
केले.
त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे
लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच
आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा
दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार
त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला.
परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली.
गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले.
अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.
१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार
नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया''हरिजन' ही
वत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले.
काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोड़ो'
चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट
झाला.
शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली
देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले.
जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट
झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड
देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले.
लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश
मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच
जनतेसमोर प्रस्तुत केले.
दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले."
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS