⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर 10th, 12th board practical, oral, category and internal evaluation exam Timetable announced by the board

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर
10th, 12th board practical, oral, category and internal evaluation exam Timetable announced by the board

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ वेळापत्रक आज परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे.

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली असून, दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रके खाली देण्यात आलेली आहेत. त्यानुसार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर 10th, 12th board practical, oral, category and internal evaluation exam Timetable announced by the board

इ. १२ वी माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयातील संगणकाची मर्यादित संख्या लक्षात घेता एकाच वेळी घेणे शक्य नसल्याने ती गटागटामध्ये घेण्यात येईल. यासाठी वेळापत्रकात प्रत्येक विषयासाठी सहा सत्र देण्यात आलेले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांना संगणक प्रयोगशाळेच्या क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट करून देण्यात येतील त्याप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षेचा दिनांक व वेळ संबंधित विद्यार्थ्यांना पुरेशा कालावधी आधी माहित करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात.

दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे अंतिम वेळापत्रक 

इ. १० वीच्या नियमित व पुनर्परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा सोबतचे परिशिष्ठानुसार शालेय स्तरावर आयोजित करण्यात याव्यात. तसेच एकाच दिवशी एकाच वेळी दोन कार्यशिक्षण विषयांची परीक्षा द्यावी लागणार नाही अशा प्रकारे परीक्षेचे नियोजन करावे. असे परिपत्रकात सांगितले आहे.

परीक्षार्थ्यांनी प्रथम सत्रासाठी सकाळी १०.३० वाजता व व्दितीय सत्रासाठी दुपारी २.३० वाजता परीक्षागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रामध्ये स. १०.३० नंतर व दुपार सत्रामध्ये दु.२.३० नंतर परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही." 

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर 10th, 12th board practical, oral, category and internal evaluation exam Timetable announced by the board

विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ वेळापत्रकामध्ये समाविष्ट करावयाच्या सूचना - तपशील

(सर्वसाधारण व व्दिलक्षी अभ्यासक्रमासाठी) 

१. पेपरचा दिनांक, वार, वेळ, विषय आणि विषय कोड यांची उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी आणि संबंधित परीक्षार्थ्यांच्या निदर्शनास आणावी.

२. परीक्षार्थ्याने प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे. सकाळ सत्रामध्ये स. १०.३० नंतर व दुपार सत्रामध्ये दु.२.३० नंतर परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

३. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार दि. ०१/०२/२०२३ ते सोमवार दि. २०/०२/२०२३ या कालावधीत घेण्यात येईल.

४. विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखडयानुसार निर्धारित कालावधीतच पार पाडण्याची जबाबदारी संबंधीत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांची राहील.

५. परीक्षार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखेपूर्वी परीक्षेचे निश्चित स्थळ व वेळेबाबत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांशी संपर्क साधावा.

६. परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था कोणत्या परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे, याबाबतचा तपशील प्रवेशपत्रात नमूद केलेला असेल याशिवाय अधिक तपशिलासाठी परीक्षार्थ्यांनी आपल्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधावा. प्रत्येक परीक्षार्थ्याने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपला बैठक क्रमांक ज्या परीक्षा केंद्रावर आहे त्या केंद्रावर जावून खात्री करून घ्यावी.

७. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेकरिता कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. परंतु अध्ययन अक्षमता व स्वमग्न विद्यार्थ्यांना फक्त गणित, ( सर्व शाखा) पुस्तपालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांच्या लेखी परीक्षेसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी असेल, मात्र त्यासाठी मंडळाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे (सदर विद्यार्थ्यांना स्वत:चा कॅल्क्युलेटर आणावा लागेल) व तो कॅल्क्युलेटर साध्या स्वरूपाचा असावा.

दहावी तोंडी परीक्षेच्या विषयानुसार नमुना प्रश्नपत्रिका | 10th Oral Exam Sample question paper

८. अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, कॅन्सरग्रस्त, मज्जातंतू विकारग्रस्त, स्वमग्न, अध्ययन अक्षमता, बहुविकलांग (स्पॅस्टिक), सेरेब्रल पाल्सी व इतर पात्र दिव्यांग परीक्षार्थ्याला लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी निर्धारित केलेल्या मूळ वेळेनुसार प्रति तास २० मिनिटे जादा वेळ देण्यात येईल. (उदा. तीन तासाच्या पेपरसाठी ६० मिनिटे प्रचलित जादा वेळेची सवलत देय राहील.) त्यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. शासन निर्णय दि. १६ ऑक्टोबर, २०१८ नुसार दिव्यांग विद्यार्थ्यास सर्व देय सवलती मंडळाच्या परवानगीने देण्यात येतील.

९. परीक्षार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावरील तसेच उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्र. २ वरील सर्व सूचनांचे बारकाईने वाचन करून पालन करावे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षार्थ्यांस परीक्षेस प्रविष्ठ होण्याची अनुमती दिली जाणार नाही.

१०. माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा व सामान्यज्ञान या दोन विषयांची परीक्षा खालीलप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल. त्यासाठी परीक्षार्थ्यांनी त्यांच्या मूळच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून परीक्षेच्या वेळेची माहिती करून घ्यावी.

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर 10th, 12th board practical, oral, category and internal evaluation exam Timetable announced by the board

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ वेळापत्रकामध्ये समाविष्ट करावयाच्या सूचना - तपशील

विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना (व्यवसाय अभ्यासक्रमासाठी) 

१.पेपरचा दिनांक, वार, वेळ, विषय आणि विषय कोड यांची उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी आणि संबंधित परीक्षार्थ्यांच्या निदर्शनास आणावी.

२. परीक्षार्थ्याने प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे. सकाळ सत्रामध्ये स. १०.३० नंतर व दुपार सत्रामध्ये दु.२.३० नंतर परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

३. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दि. ०१/०२/२०२३ ते सोमवार दि. २०/०२/२०२३ या कालावधीत घेण्यात येईल.

४. विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखडयानुसार निर्धारित कालावधीतच पार पाडण्याची जबाबदारी संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची राहील.परीक्षार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखेपूर्वी परीक्षेचे निश्चित स्थळ व वेळेबाबत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांशी संपर्क साधावा.

६. परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था कोणत्या परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे, याबाबतचा तपशील प्रवेशपत्रात नमूद केलेला असेल याशिवाय अधिक तपशिलासाठी परीक्षार्थ्यांनी आपल्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधावा. प्रत्येक परीक्षार्थ्याने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपला बैठक क्रमांक ज्या परीक्षा केंद्रावर आहे त्या केंद्रावर जावून खात्री करून घ्यावी.

७. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेकरिता कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. परंतु अध्ययन अक्षमता व स्वमग्न विद्यार्थ्यांना फक्त गणित, (सर्व शाखा) पुस्तपालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांच्या लेखी परीक्षेसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी असेल, मात्र त्यासाठी मंडळाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे (सदर विद्यार्थ्यांना स्वत:चा कॅल्क्युलेटर आणावा लागेल) व तो कॅल्क्युलेटर साध्या स्वरूपाचा असावा.

८. अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, कॅन्सरग्रस्त, मज्जातंतू विकारग्रस्त, स्वमग्न, अध्ययन अक्षमता, बहुविकलांग (स्पॅस्टिक), सेरेब्रल पाल्सी व इतर पात्र दिव्यांग परीक्षार्थ्याला लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी निर्धारित केलेल्या मूळ वेळेनुसार प्रति तास २० मिनिटे जादा वेळ देण्यात येईल. (उदा. तीन तासाच्या पेपरसाठी ६० मिनिटे प्रचलित जादा वेळेची सवलत देय राहील.) त्यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. शासन निर्णय दि. १६ ऑक्टोबर, २०१८ नुसार दिव्यांग विद्यार्थ्यास सर्व देय सवलती मंडळाच्या परवानगीने देण्यात येतील.

९. परीक्षार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावरील तसेच उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्र. २ वरील सर्व सूचनांचे बारकाईने वाचन करून पालन करावे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होण्याची अनुमती दिली जाणार नाही.

१०. महत्वाचे मंडळाने उपरोक्त मुद्दा क्र. ३ मध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय / अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, व तत्सम परीक्षा देवू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची Out of Trun व्दारे सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर गुरूवार, दि. २३/०३/२०२३ ते शनिवार, दि. २५/०३/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात यावी.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२३
वेळापत्रकामध्ये समाविष्ट करावयाच्या सूचना - तपशील

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक 

विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच तंत्र व पूर्वव्यावसायिक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, दिव्यांग विद्यार्थ्यांची शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दि. १० / ०२ / २०२३ ते बुधवार दि. ०१/०३/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेची निश्चित तारीख व दिवस इ. माहितीसाठी परीक्षार्थ्यांनी त्यांच्या शाळा प्रमुखांकडे शुक्रवार, दि. १०/०२/२०२३ पूर्वी संपर्क साधावा.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील नमूद केलेल्या तारखेपासून व सत्रानुसार घेण्यात येईल.

दहावी,बारावी बोर्ड प्रात्यक्षिक ,तोंडी ,श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा वेळापत्रक मंडळाने केले जाहीर 10th, 12th board practical, oral, category and internal evaluation exam Timetable announced by the board

सूचना

१. पेपरचा दिनांक, वार, वेळ, विषय आणि विषय कोड यांची मुख्याध्यापकांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी आणि संबंधित परीक्षार्थ्यांच्या निदर्शनास आणावी.

२. परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था कोणत्या परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे, याबाबतचा तपशील प्रवेशपत्रात नमूद केलेला असेल याशिवाय अधिक तपशिलासाठी परीक्षार्थ्यांनी आपल्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. प्रत्येक परीक्षार्थ्याने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपला बैठक क्रमांक ज्या परीक्षा केंद्रावर आहे त्या केंद्रावर जावून खात्री करून घ्यावी.

३. परीक्षार्थ्याने प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे. सकाळ सत्रामध्ये स.१०.३० नंतर व दुपार सत्रामध्ये दु.२.३० नंतर परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

४. शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०१७/(११८/१७)/एसडी-६, दि. १६ ऑक्टोबर २०१८ मधील २२ प्रकारचे दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक पेपरसाठी निर्धारीत केलेल्या वेळेपेक्षा प्रती तास २० मिनिटे जादा वेळ व इतर सवलती देण्यात येतील. त्यासाठी संबंधिताने विभागीय मंडळ कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.

५. परीक्षार्थ्यांनी आपल्या मुख्य उत्तरपत्रिकेवरील व पुरवणी उत्तरपत्रिकेवरील तसेच आलेख व नकाशा पुरवणी वरील विहित जागेवर आपला बैठक क्रमांक अक्षरी व अंकी दोन्हींमध्ये बिनचूक लिहावा.

6.परीक्षार्थ्यांना कोणतेही पुस्तक वा कागद तसेच प्रतिबंधित साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास मनाई आहे.

७.सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकेवर बारकोड पध्दतीचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना बारकोड संबंधीची माहिती परीक्षा सुरू होण्यापूर्वी देण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी ३० मिनिटे अगोदर परीक्षागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

८. परीक्षार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रातील तसेच उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्र. २ वरील सर्व सूचनांचे बारकाईने वाचन करून पालन करावे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होण्याची अनुमती दिली जाणार नाही.

९. महत्वाचे

अ) मंडळाने उपरोक्त निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय / अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, व तत्सम परीक्षा देवू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर Out of Trun व्दारे सोमवार, दि. २७/०३/२०२३ ते बुधवार, दि. २९/०३/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात यावी.

ब) परीक्षार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक अंकात व अक्षरात मुख्य उत्तरपत्रिका व पुरवणी उत्तरपत्रिकेवरील ठराविक जागा सोडून अन्यत्र कोठेही लिहिण्यास सक्त मनाई आहे. या सूचनेचे उल्लंघन केल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर मंडळ शिक्षा सूचीनुसार कारवाई करण्यात येईल.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम