प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
Educational and Professional Qualification of Teachers in
Primary/Higher Primary/Secondary and Higher Secondary Schools/Junior Colleges
25 फेब्रुवारीच्या शुद्धीपत्रकानुसार -
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनांक २९ जूलै,
२०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता १ ली ते ८
वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers
Eligibity Test- TET) अनिवार्य केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित
शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) उत्तीर्ण
अनिवार्य असेल.
इयत्ता ६ वी ते ८ वी करिता (उच्च प्राथमिक शिक्षक) :
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता:
सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “ब”
नुसार उच्च प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
अनिवार्य असेल.
शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित
शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) उत्तीर्ण
अनिवार्य असेल.
इयत्ता ९ वी ते १० वी करिता (माध्यमिक शिक्षक ):
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “क”
नुसार माध्यमिक शिक्षकांकरीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
अनिवार्य असेल.
इयत्ता ११ वी ते १२ वी करिता ( उच्च माध्यमिक / कनिष्ठ
महाविद्यालयीन शिक्षक):
आ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
या शासन निर्णयसोबत जोडलेल्या परिशिष्ट “ड”
नुसार उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता शैक्षणिक
व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.
प्रशिक्षण :
अ) ज्यांची शैक्षणिक अर्हता ५०% गुणांसह कला, विज्ञान,
वाणिज्य शाखेची पदवी आणि D.Ed. अशी असेल किंवा
किमान ४५% गुणांसह कला , विज्ञान , वाणिज्य
शाखेची पदवी आणि एक वर्षाची शिक्षण शास्त्रातील (B.Ed) पदवी
उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांची नियुक्ती दिनांक ०१ जानेवारी, २०१२ पूर्वी इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत प्राथमिक शिक्षक पदावर झाली असेल
त्यांना नियुक्तीनंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे मान्यता प्राप्त ६
महिन्यांचा प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे.
ब) ज्यांच्याकडे D.Ed. (विशेष शिक्षण) अथवा B.Ed.
( विशेष शिक्षण) अर्हता, त्यांनी नियुक्ती
नंतर प्राथमिक शिक्षणशास्त्रातील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदाद्वारे मान्यता
प्राप्त ६ महिन्यांचे प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक
आहे.
पात्रता गुणांच्या टक्केवारीत सुट :-
इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक
शिक्षकांच्या पदांकरीता अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/भटक्या
जमाती-ब/ भटक्या जमातीक/ भटक्या जमाती-ड/इतर मागास प्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग/
सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटक/ दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये ५% सुट
देण्यात येईल.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCET) नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या आणि सुधारीत केलेल्या शैक्षणिक व
व्यावसायिक अर्हता आणि आवश्यक तेथे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या,
शासकीय, अनुदानित, अशंता:
अनुदानित, विनाअनुदानित, कायम
विनाअनुदानित आणि स्वयंअर्थ सहाय्यित शाळांमधील शिक्षक पदावर नियुक्ती करिता
अनिवार्य असेल.
राज्य शासन किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या राज्य
शैक्षणिक प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांना किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमध्ये आवश्यक ती भर घालता
येईल.
प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक / कनिष्ठ
महाविद्यालयामधील शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतांमध्ये करावयाच्या
उपरोक्त सुधारणा ह्या महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती)
नियमावली,
१९८१ मध्ये करण्यात येत आहेत.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url