⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीत आणि मार्गदर्शक सूचना

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गीत,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सॉंग,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा कविता,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सातवी ची कविता,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा mp3,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा रिंगटोन डाउनलोड,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा इयत्ता सातवी,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गाणं,जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा कविता दाखवा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीत आणि मार्गदर्शक सूचना
Jai Jai Maharashtra Maja, Garja Maharashtra Maja National Anthem and Guide

कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीतामधील २ चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यगीत गायन, वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे १.४१ मिनिटात वाजविता / गाता येईल.



महाराष्ट्र राज्यगीतगायन / वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करण्यात यावे:

  • १. विचारार्थ राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.
  • २. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन/वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
  • ३. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल.
  • ४. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत / परिपाठ/ प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले / गायले जाईल.
  • ५. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास/ गाण्यास मुभा राहील.
  • ६. राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
  • ७. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
  • ८. वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.
  • ९. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
  • १०. या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.
  • ११. माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार प्रसार करण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.
  • १२. या राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम