⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील शाळांमध्ये शिवजयंती साजरी करताना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणावे – परिपत्रक

राज्यातील शाळांमध्ये शिवजयंती साजरी करताना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणावे – परिपत्रक

राज्यातील शाळांमध्ये शिवजयंती साजरी करताना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणावे – परिपत्रक

संदर्भाधिन शासन निर्णयान्वये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" च्या औचित्यावर महाराष्ट्राचे "राज्यगीत" स्विकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करतांना खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे १.४१ मिनिटात वाजविता / गाता येईल.

"राज्यगीत" गायन/वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करण्यात यावे:

  • १. विचारार्थ राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राज्यगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.
  • २. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन/वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
  • ३. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले/गायिले जाईल.
  • ४. राज्यातील शाळामध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
  • ५. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास/गाण्यास मुभा राहील.
  • ६. राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
  • ७. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
  • ८. वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.
  • ९. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

प्रस्तुत प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य आयोजन करण्यात यावे व या सदर कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच राज्यगीत सर्व शाळांमध्ये म्हणणे ही अनिवार्य करावे. 

महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणावे – परिपत्रक Download


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा,jai jai maharashtra maza garja maharashtra maza,jai jai maharashtra maza garja maharashtra maza lyrics,jai jai maharashtra maza garja maharashtra maza kavita,jai jai maharashtra maza garja maharashtra maza kavita,jay jay maharashtra maza garja maharashtra maza kavita
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम