⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत Micro Improvement Led Innovative Pedagogy स्पर्धा

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत Micro Improvement Led Innovative Pedagogy स्पर्धा

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत Micro Improvement Led Innovative Pedagogy स्पर्धा

शिक्षक पर्व कार्यक्रमातील विद्या अमृत महोत्सव" अंतर्गत उपक्रम म्हणजे माईक्रो इम्प्रूमेंट एलइडी इंनोवेटिव्ह पेडागॉजी (Micro Improvement Led Innovative Pedagogy) स्पर्धा संपूर्ण देशात अतिशय उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आली. या उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांमार्फत शालेय स्तरावर घेण्यात येत असलेल्या अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतींचे चित्रफिती (Video) दीक्षा अॅपवर मागविण्यात आले होते. यातून उत्कृष्ट अध्यापन पद्धती वापरणाऱ्या शिक्षकांना जिल्हा/ राज्य/राष्ट्रीय स्तरावरून सन्मानित करणेत येणार आहे. यासाठी अंतिम मुदत दिनांक ३१/१२/२०२२ होती. दिनांक ३१/१२/२०२२ पर्यंत राज्यातून एकूण ८३० शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षकांनी या पुरस्कारासाठी आपले चित्रफिती (Video) दीक्षा अॅपवर अपलोड करून नामांकन केलेले होते.

विद्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम | Activities under Vidya Amrit Mahotsav

दिनांक १३/०१/२०२३ अखेर जिल्हास्तरावर ८३० शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे मूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन करुन एकूण ४४ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांची राज्यस्तरावर मूल्यमापनासाठी शिफारस प्राप्त झाली आहे. तसेच राज्यस्तरावर ४४ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे मूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन करुन अंतिम एकूण १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांची शिफारस प्राप्त झाली आहे. यातील उत्कृष्ट ०३ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती (Video) यांची शिफारस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रक्रियेसाठी करण्यात येणार आहे. हे मूल्यमापन करण्यासाठी खालील पुढील ०३ निकष ठरविण्यात आलेले आहेत,

  • १. प्रस्तुत चित्रफित (Video) किती वेळा पाहण्यात आलेली आहे
  • २. चित्रफित (Video) पाहण्याचा सरासरी वेळ
  • ३. चित्रफितीस प्राप्त (Video) रेटिंग

खालील तक्त्यात १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती (Video) यांचे दीक्षा प्रणालीवरील लिंक (do_id) एकत्र स्वरुपात आपणास पुरविण्यात आलेले आहेत.

 १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती (Video) लिंक Preview


 यास्तव आपण उपरोक्त सोबत दिलेले राज्यस्तरावरील अंतिम १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती (Video) पाहून दिनांक ३१/०३/२०२३ अखेर रेटिंग करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक, विद्यार्थी व क्षेत्रीय अधिकारी यांना सूचित करावे. कृपया प्रस्तुत लिंक (do_id) वर क्लिक करून आपणास उजव्या बाजूस सर्व १५ चित्रफिती (Video) उपलब्ध होतील. आपण आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक, विद्यार्थी व क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक ३१/०३/२०२३ अखेर सर्व १५ चित्रफिती (Video) १-१ करून पूर्णवेळ पाहण्याबाबत व चित्रफितीचे शेवटी योग्य ते रेटिंग देण्याबाबत सूचित करण्यात सांगितले आहे. 

Diksha App चा वापर कसा करावा.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम