⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिकासाठी लेख / साहित्य पाठविणे

शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिकासाठी लेख / साहित्य पाठविणे Submitting articles/materials for education magazine Shikshan Sankraman

शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिकासाठी लेख / साहित्य पाठविणे
Submitting articles/materials for education magazine Shikshan Sankraman

राज्य मंडळाकडून दरमहा शिक्षण संक्रमण " शैक्षणिक मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकाचे राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये वर्गणीदार आहेत. तसेच शिक्षक, पालक इत्यादी मोठया प्रमाणावर वर्गणीदार आहेत. या मासिकातून शिक्षण क्षेत्राशी संबंधित लेख, शाळांचे नावान्यपूर्ण उपक्रम, दिनविशेषावर आधारित लेख व माहिती, अभ्यासक्रम, मूल्यमापन पध्दती, अभ्यासक्रमासंदर्भातील बदल, अध्यापन पध्दती, परीक्षा पध्दती, परिपत्रके, शासन निर्णय इत्यादी प्रसिध्द केले जातात. यासाठी लेख/ साहित्याची दरमहा आवश्यकता असते. या मासिकासाठी वैविध्यपूर्ण शैक्षणिक लेख वैशिष्टपूर्ण साहित्य, माहितीपर लेख, नवनवीन शैक्षणिक बदल, नवप्रवाह व शैक्षणिक प्रयोग, दिनविशेषांवर आधारित लेख इत्यादी संदर्भात दर्जेदार साहित्य अंकासाठी पाठविण्यात यावे. मात्र कथा, ललित प्रकारातले साहित्य शिक्षण संक्रमण मासिकात प्रसिध्द केले जात नाही. मंडळाकडे प्राप्त झालेले साहित्य संपादक मंडळाच्या निवड प्रक्रियेतून निवडले जाते. प्राप्त साहित्यातून मासिकासाठी निवड करण्याची मंडळाच्या शिफारशीनुसार केली जाईल.

शिक्षण संक्रमण २०१५ पासून ते २०१८ पर्यंत

कार्यवाही संपादक आपल्या कार्यकक्षेतील शाळा, कनिष्ठ तरी, आपण स्वतः लेख पाठवावेत व महाविद्यालयांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, साहित्यीक इत्यादी यांना 'शिक्षण संक्रमण आवाहन करणारे पत्र मासिकासाठी नियमित लेख / साहित्य पाठविण्याचे कार्यालयामार्फत पाठविण्यात यावे. तसेच शाळाभेटींच्या वेळी व विविध कार्यक्रमांच्या वेळी याबाबत प्रोत्साहित करावे, याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. आपल्या साहित्य मंडळाच्या उपरोक्त पत्यावर पोस्टाने, ईमेलद्वारे secretary.stateboard@gmail.com अथवा hodresearch.stateboard@gmail.com अथवा हस्तपोहोच पाठवता येईल. साहित्यासोबत लेखकाचे कव्हरिंग लेटर पाठवावे. त्यात लेख शिक्षण संक्रमण ' मासिकात प्रसिध्द करण्याविषयी उल्लेख करुन लेखकाचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल- आय. डी., कार्यालयाचे / शाळेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती देण्यात यावी. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम