⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळेत वाढ | Extension of time for 10th-12th board exam

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळेत वाढ | Extension of time for 10th-12th board exam

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळेत वाढ | Extension of time for 10th-12th board exam

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रु. - मार्च २०१५ परीक्षेपासून परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारीत वेळेनंतर पोहोचणा-या विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे.

तथापि विद्यार्थी हित लक्षात घेता व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळी ११.०० पूर्वी व दुपारी ३.०० पूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही याची सर्व केंद्रसंचालक, पर्यवेक्षक यांनी दक्षता घेण्याबाबत आपल्यामार्फत लेखी परिरत्रकाव्दारे सूचित करावे. परीक्षा दालनात वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्याकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परिरक्षक व केंद्रसंचालक यांचेमार्फत देण्यात आलेल्या असून, पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर शेवटी दहा मिनीटे वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात यावा. परीक्षा कालावधीत द्यावयाचे घंटेचे सुधारीत नियोजन खालील प्रमाणे आहे.

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळेत वाढ | Extension of time for 10th-12th board exam
दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळेत वाढ | Extension of time for 10th-12th board exam

Board Important links

शिक्षण विभागातर्फे इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच उपलब्ध 

शिक्षण विभागातर्फे इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्यासंच उपलब्ध 

१० वी च्या सर्व कृतीपत्रिका आणि उत्तर पत्रिका PDF | माध्यम –मराठी

१० वीच्या सर्व कृतीपत्रिका आणि उत्तर पत्रिका माध्यम –इंग्रजी

इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका संच (माध्यम- सेमी)

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम