⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा जून २०२३ | RIMC Exam date 2023 application form

rimc exam date 2023,rimc exam date 2023 application form,rimc exam date,rimc exam date 2023 application form, rimc exam date,rimc exam date 2023,rimc exam date 2024,rimc exam date,rimc exam date 2023 application form,राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा जून २०२३ National Indian Military College, Dehradun, Uttarakhand Entrance Examination June 2023

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा जून २०२३
National Indian Military College, Dehradun, Uttarakhand Entrance Examination June 2023

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, बेहराहून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक ०३ जून २०२३ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता

विद्यार्थी / विद्यार्थीनी (उमेदवार) दि. ०१ जानेवारी २०१४ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला असावा.

वय

या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक जानेवारी २०१४ रोजी ११.½ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजेच विद्यार्थी / विद्यार्थीनीचा जन्म दिनांक ०२ जानेवारी २०११ च्या आधीचा व दिनांक आणि ०१ जुलै २०१२ च्या नंतरचा नसावा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजडेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) ०३ जून २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षा शुल्क

आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून शकता:

अ) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने रु.६००/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.

ब) डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. ६००/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- चा डी.डी. कमांडंट "राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बैंक ऑफ इंडिया, तेल भवन, देहराडून, बँक कोड नं. (०१५७६) यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, २४८००३ या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत / छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी. डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.

टीप:

परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे.

आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिली जाणार नाही.

कागदपत्रे

आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • अ) जन्म दाखल्याची छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)
  • ब) अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)
  • क)अनुसूचित जाती/जमातासाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
  • ड) शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.
  • इ) आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.
  • ई) दोन पासपोर्ट साईज विद्यार्थ्याचे फोटो (मागील बाजूस विद्यार्थ्यांच्या सहीसह)

उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत जोडावेत.

सूचना : आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे - ४११००१, या पत्त्यावरती दिनांक १५ एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत.

वार दिनांक विषय वेळ गुण
शनिवार ०३/०६/२०२३ गणित सकाळी ९: ३० ते ११:०० २००
सामान्य ज्ञान दुपारी १२:०० ते १ : ०० ७५
इंग्रजी दुपारी २:३० ते ४ : ३० १२५

लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना) मौखिक परीक्षा दिनांक कळविण्यात येईल.

संपर्क

  • ·        Phone No. ०२०-२६१२३०६६/६७
  • ·        Email: mscepune@gmail.com

rimc exam date 2023,rimc exam date 2023 application form,rimc exam date,rimc exam date 2023 application form, rimc exam date,rimc exam date 2023,rimc exam date 2024,rimc exam date,rimc exam date 2023 application form

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम