⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अंशत: अनुदानित रिक्त पदांवर वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्प्यावर समायोजन

शिक्षकांचे समायोजन,शिक्षकांचे समायोजन होणार,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन,शिक्षकांचे समायोजन होणार,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन,अंशत: अनुदानित रिक्त पदांवर वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्प्यावर समायोजन

अंशत: अनुदानित रिक्त पदांवर वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्प्यावर समायोजन

Adjustment of individual recognized Part-aided teachers to the same stage of pay in the partially-aided vacancies

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. अशा सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे सद्यस्थिती असलेल्या नियमानुसार समायोजन करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटना यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांना पुन्हा सेवेची संधी देणेसाठी समान टप्प्यावरील अंशत: अनुदानित पदे रिक्त असल्यास अशा रिक्त पदावर समायोजनाबाबत तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार शासन निर्णय संकेतांक २०२२१२१२१२३५२९६६२१ हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानुसार खालील माहिती देण्यात आलेली आहे.

सन २०२२-२३ च्या संचामान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत:अनुदानित शिक्षकांचे समायोजन खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१. आयुक्त (शिक्षण), यांच्या स्तरावर प्रथम राज्यातील रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदाचा आढावा घेण्यात यावा.

२. आढाव्याअंती राज्यात अंशत: अनुदानित पदे रिक्त राहात असल्याचे निदर्शनास आल्यास अशा पदांची यादी तयार करावी. सदर रिक्त पदांवर पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन पुढील प्रमाणे करावे. :

  • ·        सन २०२२-२३ च्या संचमान्यतेमध्ये पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांची जेष्ठता सूची आयुक्त (शिक्षण) यांनी तयार करावी.
  • ·        तद्नंतर रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदांवर सेवा जेष्ठतेनुसार समायोजन करावे. समायोजन करतांना विहीत बिंदुनामावलीनुसार आरक्षण, विषय इ. बाबींच्या सर्वसाधारण नियमांचे पालन करुन समायोजन करण्यात यावे.
  • ·        वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे समायोजन केवळ अनुदानाच्या समान टप्प्यावर पद उपलब्ध असल्यास अनुज्ञेय राहील. मात्र अनुदानाच्या टप्प्याचे पद उपलब्ध नसल्यास सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठल्याही परिस्थितीत करता येणार नाही.
  • ·        वैयक्तिक मान्यता प्राप्त अशंत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे प्रथम संस्थेतर्गत समान अनुदान टप्यावरील रिक्त पद उपलब्ध असल्यास समायोजन करण्यास प्राधान्य द्यावे. पद उपलब्ध नसल्यास इतर संस्थेच्या अनुदानाच्या समान टप्प्यावरील अंशत:अनुदानित पदावर समायोजन करावे. अशा प्रकारे समान टप्प्यावर पद उपलब्ध नसल्यास समायोजन करता येणार नाही व कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा बदलून समायोजन करता येणार नाही.

३. या शासन निर्णयान्वये समायोजन झालेल्या शिक्षकांस सेवासमाप्त झाल्यापासून ते समायोजन होईपर्यतच्या कालावधीतील म्हणजेच सेवा न केलेल्या कालावधीतील वेतन व भत्ते यांची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय होणार नाही.

४. हा शासन निर्णय फक्त शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ च्या संचमान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अशंत: अनुदानित कर्मचाऱ्यांना लागू राहील.

सदर माहितीचा शासन निर्णय संकेतांक २०२२१२१२१२३५२९६६२१ हा खाली जोडलेला आहे त्याचा योग्य माहितीसाठी वापर करावा. 

शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्प्यावर समायोजन.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम