⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

उन्हाळी सुट्टी 2 मे पासून तर 2023-24 हे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून होणार सुरु - परिपत्रक

उन्हाळी सुट्टी २ मे पासून तर नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 हे 15 जून पासून सुरु | Summer vacation starts from 2nd May and new academic year starts from 15th June

उन्हाळी सुट्टी २ मे पासून तर नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 हे 15 जून पासून सुरु | Summer vacation starts from 2nd May and new academic year starts from 15th June


राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची 2023 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करण्याबाबत शिक्षण संचालक पुणे यांनी 20 एप्रिल रोजी परिपत्रक काढून खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.

नवोदय सराव प्रवेश परीक्षा मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका संच घरपोच मिळवा.

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्षा करिता २०२३-२४ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश 

१. मंगळवार दि. ०२ मे, २०२३ पासून उन्हाळी सुट्टी लागू करुन सदर सुट्टीचा कालावधी बुधवार दि. १४ जून, २०२३ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये गुरुवार दि. १५ जून, २०२३ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा शुक्रवार दि. ३० जून, २०२३ रोजी सुरू होतील.

२. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल दि. २९ एप्रिल २०२३ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत जाहिर करवा, तथापि तो निकाल विद्यार्थी/ पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील.

३. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

४. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील परिशिष्टामध्ये शालेय कामकाजाचे किमान दिवस

  • ·        अ) इ. १ ली ते ५ वी साठी किमान २०० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान ८०० घडयाळी तास
  • ·        ब) इ. ६ वी ली ते ८ वी साठी किमान २२० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान १००० घडयाळी तास निश्चित केले आहेत. त्यानुसार कामाचे दिवस होणे आवश्यक आहे.

५. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम