⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

गणितातील महत्वाची सूत्र | important formula in mathematics

important formula in mathematics,basic formula in mathematics,basic formula in mathematics pdf,important formula in maths class 10,important formulas in maths for class 9,important formulas in maths class 11,important formulas in maths class 12,important formulas in maths class 8,most important formulas in mathematics,important formulas in engineering mathematics

गणितातील महत्वाची सूत्र | important formula in mathematics


आयात, चौरस, त्रिकोण, कोन :-

आयत

आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)  

आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी

आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी  

आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी

आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.

 

चौरस

चौरसाची परिमिती= बाजूची लांबी    

चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2

चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.

दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.

 

समभुज चौकोण

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2

समलंब चौकोण

समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2

समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज

समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर

 

त्रिकोण

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2

काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ   = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2

पायथागोरस सिद्धांत काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

वय व संख्या

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांतील फरक) ÷ 2

वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

दिनदर्शिका

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.

नाणी

एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज

एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक पहिल्या नोटेचा क्रमांक + 1

पदावली

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)

किंवा BODMAS हा क्रम ठेवावा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

गाडीचा वेग वेळ अंतर :-

A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5

B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5

C) गाडीचा ताशी वेग  = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ  × 18/5

D) गाडीची लांबी  = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.

1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर  = 3600/1000 = 18/5

G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2

H) गाडीने कापावायचे एकूण अंतर गाडीची लांबी = बोगध्याची लांबी

I) भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक

लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रमाण भागिदारी :-

नफ्याचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर

भंडावलांचे गुणोत्तर = नफ्याचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर

मुदतीचे गुणोत्तर = नफ्याचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 नफा तोटा :-

नफा = विक्री खरेदी  

विक्री = खरेदी + नफा    

खरेदी = विक्री + तोटा

तोटा = खरेदी विक्री  

विक्री = खरेदी तोटा  

खरेदी = विक्री नफा

शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100

विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100

खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

सरळव्याज :-

सरळव्याज (I) = P×R×N/100

मुद्दल (P) = I×100/R×N

व्याजदर (R) = I×100/P×N

मुदत वर्षे (N) = I×100/P×R

चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 सरासरी :-

1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14

संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81×20/2 = 810

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम