⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

SCERT पुणे येथे राज्यस्तरीय कार्यालयातील विषय सहायक,गट क रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरणे

SCERT पुणे येथे राज्यस्तरीय कार्यालयातील विषय सहायक,गट क  रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरणे

SCERT पुणे येथे राज्यस्तरीय कार्यालयातील विषय सहायक,गट क  रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरणे

सदर लिंक भरण्यासाठी शासन निर्णय नुसार नियम, अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत. सदर संदर्भिय पत्राचे अवलोकन करून आपला परिपूर्ण अर्ज दि.10 एप्रिल ते 24 एप्रिल,2023 या कालावधीत सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत भरण्यासाठी लिंक खुली राहणार आहे.

अर्ज लिंक

 

सहायक प्रतिनियुक्तीस पुढील अटी व शर्ती

१. सदरची निवड ही प्रतिनियुक्तीवर असून प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर त्या पदावर पुढील सेवेच्या कालवधीत कोणताही हक्क असणार नाही.

२. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये कोणताही विशेष भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

३. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये वेतन व भत्ते मूळ आस्थापनेवरुन काढण्यात येतील.

४. प्रतिनियुक्त कालावधीमध्ये संबंधित विषय सहायक, समुपदेशक यांचे काम समाधानकारक नसल्यास अथवा संस्थेच्या प्रतिमेस / हितास बाधा पोहचेल असे गैरवर्तन केलेले निदर्शनास आल्यास त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करुन मूळ आस्थापनेवर रुजू व्हावे लागेल.

५. प्रतिनियुक्ती कालावधी हा एक वर्षाचा असेल त्यानंतर मूल्यमापन करण्यात येईल. मूल्यमापनातील प्रतिसादानुसार पुढील नियुक्ती कालावधी वाढविण्यात येईल.

६. प्रतिनियुक्तीसाठी शिक्षक संवर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील (जि.प./न.प./ न.पा./ म.न.पा.) प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असावा. तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व म.शि.से. गट क अधिकारी यांनाही लिंक भरता येईल.

७. प्रतिनियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी जिल्हास्तरावर, विभागस्तरावर व राज्यस्तरावर विविध स्वरुपाचे काम करण्याचा अनुभव असावा.

८. गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून विविध पातळीवर पर्यवेक्षण व संनियंत्रण करण्यासोबतच समर्पण भावनेतून काम करण्याची प्रेरणा असलेल्या लोकांनीच यामध्ये सहभाग घ्यावा.

९. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता : किमान बी.ए./बी.एस्सी. / बी. कॉम व बी.एड. असावे तथापि, एम.ए., एम. एड्. / एम. फिल. / पी.एच.डी. असणा-या शिक्षकांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.

१०. संगणक ज्ञान मराठी व इंग्रजी टायपिंग, पी.पी.टी. तयार करता येणे आवश्यक आहे.

११. विषय सहायक या पदावर प्रतिनियुक्तीवर निवड झाल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिलेल्या कर्तव्य व जबाबदा-या पूर्ण करणे बंधनकारक राहील.

१२. प्रतिनियुक्तीने निवड झालेल्या विषय सहायकांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील तरतूदीनुसार नैमत्तिक, अर्जित व वैद्यकिय रजा अनुज्ञेय राहतील.

१३. प्रतिनियुक्तीने निवड झालेल्या उमेदवाराने कार्यालय प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

१४. प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांची किमान सेवा ७ वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. तसेचसेवानिवृत्तीस दोन वर्षे शिल्लक असलेल्या उमेदवारास प्रतिनियुक्तीस अर्ज करता येणार नाही.

१५. प्रतिनियुक्तीने विषय सहायक पदावर निवड झाल्यानंतर रुजू होताना विहित नमुन्यामध्ये बंधपत्र भरुन देणे बंधनकारक राहील.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम