छोटीशी बोधकथा मराठी,बोधकथा मराठी मधून,बोधकथा मराठी,बोधकथा मराठीत,बोधकथा मराठी माहिती,कथा माहिती मराठी,मराठी बोधकथा तात्पर्य,मराठी बोधकथा तात्पर्य छोटी
गाय आणि सिंह | बोधकथा
उन्हाळी सुट्टी अन आजीच्या गोष्टी......... भाग २
गोष्ट ऐका आणि वाचा .......
एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी
आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंगावरून त्यांना ही नावे पडली होती.
त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या.
एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला.
परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही.
सिंहाने विचार केला की, यांच्यात फूट पाडली तर आपले काम सहज
होईल. शेवटी तो भुन्या गाईजवळ जाऊन म्हणाला, "मला तुझी
फार आठवण येत होती, मला तुझ्या तब्येतीची फार काळजी
वाटते." भुरी गाय सिंहाच्या या बोलण्याला फसली आणि तिने त्याच्याशी मैत्री
केली.
दुसऱ्या दिवशी सिंहाने भुऱ्या गाईला एकटीलाच बोलावले आणि तो
म्हणाला, "तुझा रंग काळ्या गाईसारखा आहे, परंतु पांढरी गाय तुमच्या पेक्षा वेगळी आहे. आपण तिला मारून टाकू."
भुरी गाय त्याला हो म्हणाली आणि तिने काळ्या गाईला बोलण्यात
गुंतवून ठेवले. तेवढ्या वेळात सिंहाने पांढऱ्या गाईला मारून टाकले. काही दिवसांनी
असेच त्याने काळ्या गाईला सुद्धा मारले. नंतर सिंहाने भुन्या गाईला सुद्धा
क्रूरपणे मारले व खाऊन टाकले. सिंहाने गाईंमध्ये फूट पाडून आपले काम साध्य केले
होते.
बोध : आपल्या चांगल्या मित्रांना कधीही धोका देऊ नये.
Tag- छोटीशी बोधकथा मराठी,बोधकथा मराठी मधून,बोधकथा मराठी,बोधकथा मराठीत,बोधकथा मराठी माहिती,कथा माहिती मराठी,मराठी बोधकथा तात्पर्य,मराठी बोधकथा तात्पर्य छोटी,मराठी बोधकथा तात्पर्य लहान,बोधकथा संग्रह मराठी बोधकथा तात्पर्य
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS